आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सारा अली खानचे घर कोरोनाच्या विळख्यात:कार चालकाला कोरोनाची लागण, सारासह कुटूंबातील इतर सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह 

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कार चालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे.

अभिनेत्री सारा अली खानचे घरदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सोमवारी रात्री साराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या कार चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. या कार चालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आले असून साराच्या कुटुंबातील इतर सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये साराने लिहिले आहे, 'आमचा कार चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बीएमसीला याविषयी कळवले असून कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे'

  • माझी आणि कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह

साराने पुढे सांगितले, 'माझे कुटुंबीय, घरातील स्टाफ आणि माझी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु, आमच्या सगळ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही काळजी घेत आहोत. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बीएमसीचे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला तात्काळ मदत केली आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. सगळ्यांनी काळजी घ्या', अशी पोस्ट साराने शेअर केली आहे. सारा तिची आई अमृता सिंग आणि धाकटा भाऊ इब्राहिम यांच्यासोबत राहते. 

View this post on Instagram

🙏🏻🙏🏻🙏🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on Jul 13, 2020 at 11:28am PDT

  • अमिताभ-अभिषेक यांच्यासह अनुपम खेर यांच्या आईला संसर्ग

यापूर्वी शनिवारी मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सध्या दोघांवर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच अमिताभ यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनादेखील कोरोना संसर्ग झाला असून दोघींनाही होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे.  

याशिवाय अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी ही बातमी समजल्यानंतर बीएमसीने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. यासह अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह घरातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे.

  • आमिर-करण यांच्यासह इतर सेलेब्रिटींच्या स्टाफलाही संसर्ग झाला होता

गेल्या महिन्यात आमिर खानच्या घरातील कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. याबद्दल आमिरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती. यापूर्वी चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरातील दोन कर्मचा-यांना कोरोना संसर्ग झाला होता.

या दोघांशिवाय बोनी कपूरचे स्टाफ मेंबरही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने अभिनेत्री मलायका अरोराच्या इमारतीलाही कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले गेले होते. इतर सेलिब्रिटींमध्ये झोया मोरानी, ​​करीम मोरानी, ​​शाजा मोरानी, ​​किरण कुमार, कनिका कपूर आणि मोहेना सिंग हेदेखील कोरोनामुळे संसर्ग झाल्यानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.

सारा तिचा धाकटा भाऊ आणि आईसोबत राहते.