आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन:दीपिका आणि श्रद्धापाठोपाठ सारा अली खान चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, या पाच प्रश्नांची द्यावी लागतील तिला उत्तरे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा दुपारी एक वाजेच्या सुमारास एनसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल झाली.

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची एनसीबीकडून आज चौकशी होणार आहे. सारा थोड्या वेळापूर्वीच एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. सारापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास दीपिका पदुकोण एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. त्यानंतर श्रद्धा तेथे आली. एकाच दिवशी दीपिका, सारा आणि श्रद्धा यांची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे.

शुक्रवारी याप्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची चौकशी झाली. रिया मार्फत ड्रग्ज मागवल्याची कबुली यावेळी रकुलने दिली आहे. आता सारा, दीपिका आणि श्रद्धा यांच्या चौकशीतून कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आणि सध्या तुरुंगात असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे एनसीबीने तिला समन्स बजावले आणि आज ती चौकशीसाठी हजर झाली.

एनसीबीच्या चौकशीत सारा अली खानला विचारले जाऊ शकतात हे प्रश्न -

  • आपला मोबाइल नंबर कन्फर्म करा. सुशांत सिंह राजपूतसोबत तुमची भेट कशी झाली आणि त्यांच्यासोबत तुमचे नाते काय होते?
  • सुशांत केदारनाथ चित्रपटावेळी ड्रग्ज घेत होता का? त्याच्यासोबत तुम्ही कधी ड्रग्ज घेतली का?
  • तुम्ही सुशांतसोबत थायलंडला गेल्या होत्या का? तेथे तुम्ही ड्रग्ज घेतले किंवा तुमच्या टीममधून कुणी असे केले का?
  • सुशांतच्या पावना येथील फार्म हाऊसवर तुम्ही किती वेळा गेल्या होत्या? तुम्ही अशा कोणत्या पार्टीत सहभागी झाल्या का जिथे ड्रग्जचा वापर झाला?
  • तुम्ही कधी कुणाकडून ड्रग्ज खरेदी केली का? करमजीत उर्फ केजे नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? ते कधी तुमच्याजवळ ड्रग्ज घेऊन आले का?

ड्रग्ज प्रकरणात कसे समोर आले सारा अली खानचे नाव

रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, केदारनाथ या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सारा आणि सुशांत एकमेकांच्या जवळ आले होते. आणि सुशांतच्या ड्रग्ज पार्टीत ती सहभागी झाली होती. याशिवाय सुशांतच्या पावनास्थित फार्महाऊसमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीतही तिने हजेरी लावली होती. तेथील एका बोटमननेदेखील सारा तिथे आल्याचे सांगितले होते. एनसीबीला सुशांतच्या या फार्महाऊसवरुन अमली पदार्थ जप्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...