आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री सारा अली खान अलीकडेच केदारनाथ यात्रेला गेली होती. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या सहलीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना साराने आनंदी आयुष्य दिल्याबद्दल केदारनाथचे आभार मानले आहेत.
साराने लिहिले, "मी जेव्हा पहिल्यांदा केदारनाथला आले होते, तेव्हा मी माझ्या आयुष्यात कधीही कॅमेराचा सामना केला नव्हता. खूप कमी लोक इथे येतात आणि जे येतात ते खूप भाग्यवान असतात. मीही त्या लोकांपैकी एक आहे, कारण मी इथवर येऊ शकले," असे ती म्हणाली आहे.
साराच्या पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांनी काढली सुशांतची आठवण
साराच्या या पोस्टवर अनेकांना तिच्या 'केदारनाथ' या चित्रपटातील मुक्कू हे पात्र आठवले. तर काहींनी सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे पात्र मन्सूर खानची आठवण झाल्याचे सांगितले. एका यूजरने लिहिले, 'ही पोस्ट पाहिल्यानंतर मला सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली.' तर एकाने लिहिले, 'सुशांत सिंहशिवाय केदारनाथ पाहण्यात मजा येत नाही.'
सारा अली खानचे चित्रपट
सारा अलीकडेच गॅसलाइट या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. याशिवाय विकी कौशलसोबत एका अनटाइटल्ड चित्रपटाचीदेखील नुकतीच घोषणा झाली. सारा अली खान 'ए वतन मेरे वतन', 'मर्डर मुबारक' आणि जगन शक्ती यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच सारा अली खानने होमी अदजानियाच्या 'मर्डर मुबारक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.