आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज प्रकरणात सारानंतर आता श्रद्धाचे नाव:केअर टेकरचा दावा - सुशांतच्या फार्महाऊसमध्ये श्रद्धा कपूरने केली होती पार्टी, 2018 मध्ये सारा अली खानने अनेकदा केली पार्टी करायची

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री श्रद्धा कपूर छिछोरे या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर पार्टीसाठी आपल्या सहकलाकारांसोबत सुशांतच्या फार्महाऊसवर गेली होती.
  • 'केदारनाथ' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांत आणि सारा जवळ आले होते. सुशांतने साराला प्रपोज करण्यासाठी ट्रीप प्लान केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननंतर आता श्रद्धा कपूरचे नाव सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलेल्या जबाबात या दोन्ही अभिनेत्रींची नावे घेतली आहेत. त्यामुळे सारा आणि श्रद्धाला लवकरच समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत सुशांतच्या फार्महाऊसचा केअर टेकर राहिलेल्या रईसने खुलासा केला की, 'छिछोरे' या चित्रपटाच्या यशानंतर श्रद्धा कपूर पार्टी करण्यासाठी सुशांतच्या फार्महाऊसवर आली होती.

  • श्रद्धा रात्री आठ वाजेपर्यंत फार्महाऊसवर थांबली होती

रईसच्या म्हणण्यानुसार, श्रद्धाव्यतिरिक्त 'छिछोरे' या चित्रपटातील इतर कलाकार लोणावळ्यातील पावना तलावाच्या काठावर असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर आले होते. सर्वांनी येथे पार्टी केली होती. श्रद्धा कपूर रात्री आठ वाजेपर्यंत या पार्टीत थांबली होती. तर इतर कलाकार रात्री 11 च्या सुमारास मुंबईसाठी रवाना झाले होते.

  • 2018 मध्ये सारा अनेकदा फार्महाऊसवर आली होती

रईसने सांगितल्यानुसार, 2018 मध्ये 'केदारनाथ' चित्रपटाच्या रिलीजच्या आसपास सारा अली खान अनेकदा सुशांतबरोबर फार्महाऊसवर आली आणि त्याच्यासोबत पार्टी करायची. रईसने एका मुलाखतीत सांगितले की, 2018 पासून साराने या फार्महाऊसवर येणे सुरु होते. जेव्हा ती येथे यायची तेव्हा दोन ते तीन दिवस सुशांतसोबत मुक्काम करायची.

डिसेंबर 2018 मध्ये थायलंड ट्रीपहून परतल्यानंतर सुशांत सर आणि सारा मॅम विमानतळावरून थेट फार्महाऊसवर आले होते. त्यावेळी रात्रीचे 10 किंवा 11 वाजले असावेत. त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्रही होते, असेही रईसने सांगितले होते.

  • फेब्रुवारी 2019 मध्ये सारा-सुशांतचे ब्रेकअप

रईसच्या म्हणण्यानुसार, सुशांत साराला प्रपोज करणार होता. यासाठी त्याने पहिले दमण आणि नंतर केरळ ट्रीपचे प्लानिंग केले होते. मात्र काही कारणास्तव या दोन्ही ट्रीप रद्द झाल्या होत्या. रईसच्या मते, 2019 च्या फेब्रुवारी किंवा मार्चदरम्यान सुशांत आणि साराचे ब्रेकअप झाल्याचे त्याला समजले होते. सारा मॅम जानेवारी 2019 नंतर फार्महाऊसवर आली नाही, असा खुलासा रईसने केला.

  • रियासह 20 जणांना ड्रग्ज प्रकरणात झाली आहे अटक

रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती मुंबईच्या भायखळा तुरुंगात आहे. तिचा दोनदा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. रियावर सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. रियाने जवळपास 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे एनसीबीला सांगितली असल्याचा दावा केला जातोय.

एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासह 20 जणांना अटक केली आहे. यामध्ये सुशांतचे स्टाफ मेंबर आणि काही ड्रग्ज पॅडलर्सचा समावेश आहे. रियाचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर सुशांत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. या चॅट्समध्ये ड्रग्जची खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.

बातम्या आणखी आहेत...