आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sara Ali Khan Spoke On Amrita Singh And Saif Ali Khan's Deteriorating Relationship 'Both Were Not Happy Together, Divorce Was The Best Decision'

सेलेब्स लाइफ:आई अमृता सिंह आणि वडील सैफ अली खानच्या नात्याविषयी सारा अली खान म्हणाली - 'दोघेही एकत्र आनंदी नव्हते, घटस्फोट हा त्यांचा योग्य निर्णय होता'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साराने अलीकडेच वूटच्या ‘फीट अप विथ द स्टार्स’ सीझन 3 या शोमध्ये हजेरी लावली.

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये लग्न केले आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा ताबा मिळाला. सैफ नेहमीच आपल्या या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. अलीकडेच एका कार्यक्रमात साराने आईवडिलांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. आईवडिलांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय हा त्यांचा एक चांगला निर्णय होता, असे सारा म्हणाली आहे.

साराने अलीकडेच वूटच्या ‘फीट अप विथ द स्टार्स’ सीझन 3 या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने आई-वडीलांच्या घटस्फोटाविषयी सांगितले आहे. सारा म्हणाली, 'हे खूप सोपे होते. जर तुम्ही पाहिले तर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. त्यापैकी एक म्हणजे जिकडे कुणीही आनंदी नाही आणि दुसरा पर्याय म्हणजे सगळेजण वेगवेगळे राहून त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्हाला प्रचंड आनंद होतो.'

मला वाटत नाही की दोघे एकत्र आनंदी होते : सारा
सारा पुढे म्हणाली, 'मी माझ्या आईसोबत राहते. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझे वडील फोनच्या माध्यमातून नेहमी माझ्याशी बोलत असतात आणि मी कधीही त्यांना भेटू शकते. मला दोघे एकत्र आनंदी होते, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य निर्णय होता. कदाचित आम्ही पुर्वी एवढे आनंदी नव्हतो. त्यामुळे सर्व काही कोणत्यातरी कारणाने घडत असते.'

'कुली नंबर 1' नंतर सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...