आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचा परिणाम:सुशांत मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर  'हीरोपंती 2' मधून सारा अली खानची हकालपट्टी, आता टायगरसोबत झळकणार तारा सुतारिया

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा अली खानचे दोन चित्रपट रांगेत आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ड प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्री सारा अली खानवर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. त्याच्या तिच्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम झाला आहे. रिपोर्टनुसार, वादात नाव अडकल्यानंतर तिला आता टायगर श्रॉफ स्टारर 'हीरोपंती 2' या चित्रपटामधून काढून टाकण्यात आले आहे. असं म्हटलं जात आहे की, आता तारा सुतारिया हिला या चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे.

टायगरच्या सांगण्यावरून ताराची वर्णी लागली
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणात साराचे नाव आल्यानंतर तिची 'हीरोपंती' मधून काढून टाकण्यात आले. 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटात काम केल्यामुळे तारा सुतारिया ही टायगरची चांगली मैत्रीण आहे. म्हणून टायगरने निर्मात्यांना तिला कास्ट करण्यास सांगितले. आउटसाइड असल्याने तारा साराची योग्य रिप्लेसमेंट असल्याचे निर्मातांना वाटले.

अहमद खान आहेत दिग्दर्शक
साजिद नाडियाडवालांच्या नाडियाडवाला ग्रँड सन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'हीरोपंती 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अहमद खान यांच्या खांद्यावर आहे. लवकरच यूएईमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. चित्रपटाच्या संभाव्य प्रदर्शनाची तारीख 16 जुलै 2021 आहे.

सारा अली खानचे दोन चित्रपट रांगेत आहेत
साराविषयी सांगायचे म्हणजे तिचा पुढचा चित्रपट 'कुली नं. 1' हा असून यात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार आणि धनुष स्टारर ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...