आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साराचा व्हायरल व्हिडिओ:भारतीय लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली सारा अली खान, चाहते म्हणाले - 'किती छान दिसतेय'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारा अली खान अनेकदा भारतीय लूकमध्ये स्पॉट होत असते. नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा देसी स्टाइलमध्ये लक्ष वेधून गेली. व्हाईट सूट, गुलाबी दुपट्टा, मॅचिंग जुती, हातात बांगड्या आणि कानात झुमके घालून अशा पारंपरिक लूकमध्ये सारा अलीकडेच विमानतळावर दिसली. साराच्या या भारतीय लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले 'किती छान दिसत आहे', तर दुसऱ्याने लिहिले - 'माशाअल्लाह'.

फिटनेस फ्रीक आहे सारा, अलीकडेच जिममधील व्हिडिओ झाला होता व्हायरल
सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. 2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी सारा फिटनेस फ्रीक आहे. अलीकडेच ती आई अमृता आणि भाऊ इब्राहिमसोबत लंडनला ट्रिपला गेली होती. तेथून परतल्यानंतर तिने तिचा वर्कआउटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सारा इंटेन्स वर्कआउट करताना दिसली होती. सारा नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत मोटिव्हेशनल वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते.

नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओ सारा जिममध्ये चांगलाच घाम गाळताना दिसली. इट्स गुड टू बॅक, संपला हॉलिडे आता ट्रॅकवर परतण्याची वेळ आहे, असे कॅप्शन साराने तिच्या व्हिडिओला दिले होते.

सारा तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. केदारनाथनंतर ती 4 ते 5 चित्रपटांत झळकली आहे. मागच्या काही वर्षांत तिच्या कामात साराने या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूवी दिलेल्या एका मुलाखतीत साराने बोल्डनेस आणि तिच्या आतापर्यंच्या करिअरवर भाष्य केले होते. साराने काही महिन्यांपूर्वी ‘Elle India’ दिलेल्या मुलाखतीत, “मी अशी मुलगी आहे जी मंदिरातही जाते आणि बिकिनी देखील घालते” असे वक्तव्य केले होते.

दरम्यान सारा अली खानच्या करिअरबद्दल बोलायचे तर की लवकरच ‘गॅसलाइट’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित एका चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर ‘गॅसलाइट’मध्ये तिच्यासोबत विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका आहे.

बातम्या आणखी आहेत...