आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकले का ?:‘अश्वत्थामा’मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार ही जोडी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जानेवारी रोजी विकीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता विकी कौशलला ब-याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी त्यांच्या आगामी ‘द इम्मॉर्टल ऑफ अश्वत्थामा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी विकीचीच निवड केली आहे. हा चित्रपट अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आधारित असून विकी त्यात अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 11 जानेवारी रोजी विकीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता.

विकीसोबत झळकणार सारा
आदित्य धर दिग्दर्शित ‘द इम्मॉर्टल ऑफ अश्वत्थामा’ या चित्रपटात विकी कौशलसोबत सारा आली खान दिसणार आहे. प्रेक्षकांना प्रथमच ही जोडी पाहायला मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून सारा या चित्रपटात येणार असल्याची चर्चा होती. सूत्रांनुसार, आता साराचे नाव निश्चित झाले आहे. ते लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करतील.

दुसरीकडे विकीने चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून तो मिक्स्ड मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे. चित्रपटाविषयी सांगायचे तर चित्रीकरणासाठी दिग्दर्शक प्रचंड आतुर असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतासह परदेशातही याचे चित्रीकरण केले जाणार आहे. एकूण 80 ते 90 दिवसांचे हे चित्रीकरण भारतासह ग्रीस, न्यूझीलंड आणि जपानमध्येही होणार आहे.

'तख्त'मध्ये झळकणार विकी
विकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्टसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. ‘तख्त’मध्ये मुघल काळातील कथा दाखवली जाणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात विकी-आलियासह रणवीर सिंह, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर हे कलाकार दिसतील.

बातम्या आणखी आहेत...