आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साराचा 26 वा वाढदिवस:सारा अली खानच्या लेट नाइट बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, भाऊ इब्राहिम आणि जवळच्या मित्रांसोबत केली धमाल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा 'अतरंगी रे' मध्ये दिसणार

अभिनेत्री सारा अली खान आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिनाचे औचित्य साराचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, सारा अली खानच्या लेट नाइट वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साराने तिचा वाढदिवस तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि खास मित्रांसोबत साजरा केला आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये सारा अली खानचे नाव गुलाबी रंगाच्या फुग्याने लिहिलेले दिसत आहे. तसेच हॅपी बर्थडे सारा अली खान असेही लिहिलेले दिसत आहे. फोटोमध्ये सारा तिचा भाऊ इब्राहिम आणि मित्रांसोबत पोज देताना दिसत आहे. साराच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ तिच्य मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिनेत्री जान्हवी कपूरनेही सारासोबतचा एक अनसीन फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला कॅप्शन दिले, "सारा अली खान वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला आशा आहे की हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम आठवणींनी भरलेले असेल. क्रिएटिव्ह जर्नी, ग्रेट फूड, ग्रेटर एब्स आणि भरपूर आनंद, यश आणि प्रेम,' अशा शब्दांत जान्हवीने साराला शुभेच्छा दिल्या आहेत. सैफ अली खानची बहीण सबा हिनेही खास फोटो कोलाज शेअर करून साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सारा 'अतरंगी रे' मध्ये दिसणार
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा हिने 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सारासह दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. सारा अलीकडे 'कुली नंबर 1' चित्रपटात वरुण धवनसोबत दिसली होती. आता ती लवकरच आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' मध्ये अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासह झळकणार आहे. 'अतरंगी रे' व्यतिरिक्त ती 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' आणि 'नखरेवाली' मध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...