आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:टीव्ही शो 'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू, कार खड्ड्यात पडली

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे मेकर जेडी मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती.

अचानक वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार खड्ड्यात पडली, त्यात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचाही मृत्यू झाला होता. तो त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला होता.

निर्माते जेडी मजेठिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "आयुष्य खूप अप्रत्याशित आहे. साराभाई vs साराभाई मधील 'जॅस्मिन' म्हणून ओळखली जाणारी एक अतिशय चांगली अभिनेत्री, खास मैत्रीण वैभवी उपाध्यायचे निधन झाले. उत्तरेत तिचा अपघात झाल. कुटुंबीय तिला उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणतील. RIP वैभवी, "

वैभवीबद्दल सांगायचे तर, दीपिका पदुकोणसोबत 2020 मध्ये 'छपाक' आणि 'तिमिर' (2023) मध्ये काम केले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई मधील जॅस्मिनच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. त्याच वेळी, तिला या शोमध्ये चांगलीच पसंती मिळाली, ज्यामुळे त्याचे फॅन फॉलोइंग देखील झाले.