आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:सारा अली खानला आली लहानपणीची आठवण, म्हणाली, "मला वाटायचे की माझे वडिल खराब भाषा बोलतात आणि आई पॉर्न साईट चालवते"

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सारा अली खान हिने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या आई-वडिलांवर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला असे वाटायचे की, माझे वडिल सैफ अली खान आणि माझी आई अमृता सिंह हे दोघेही निगेटिव्ह व्यक्ती आहेत.

पुढे सारा म्हणाली की, लहानपणी एक मी 'ओमकारा' आणि 'कलयुग' हे दोन चित्रपट पाहिले होते. त्यानंतर मला असे वाटायचे की, चित्रपट दाखवल्याप्रमाणे माझे वडिल सैफ अली हे खरोखरच खराब भाषेचा वापर करतात. आणि आई अमृता सिंह ही पॉर्न साईट चालवते. असे साराने एका मुलाखतीत ऩुकतेच म्हटले आहे.

काही चित्रपट पाहिल्यानंतर आई-वडिलांना चुकीचे समजायची सारा

सारा म्हणाली की, "मला चांगल्या प्रकारे आढवते की, मी 2005 साली 'कलयुग' आणि 2006 साली 'ओमकारा' हा चित्रपट पाहायला होता. त्यानंतर मला खरोखर असे वाटायचे की माझे आई-वडिल हे चुकीचे काम करत आहे.

मी तेव्हा लहान होते, तेव्हा असे वाटायचे की, माझे वडिल खराब भाषेचा वापर करतात. आणि माझी आई ही पॉर्न साईट चालवते. त्यानंतर जेव्हा दोघांनाही बेस्ट अॅक्टरचे पुरस्कार मिळाले. त्यानंतर मी चक्कीत राहिले. की अरे हे काय झाले."

साराला आली जुनी आठवण
साराने मागील काही वर्षांच्या आठवणींना उडाळा देत म्हटले आहे की, "मी लहानपणापासून एखाद्या गोष्टीच्या खोलवर जाण्यासाठी प्रयत्न करते. याचे मी कुठेही प्रशिक्षण घेतलेले नाही. मी स्वत: स्वत:ला पुश करण्याचे प्रयत्न करते. आयुष्यात वेगवेगळ्या वळणावरती नवीन-नवीन अनुभव देखील येतच असतात" असे सारा म्हणाली.

2004 साली वेगळे होण्याचा निर्णय
ओमकारा या चित्रपटात सैफ अली खान यांनी ईश्वर लंगड़ा या रूपात भुमिका निभावली होती. या चित्रपटात अजय देवगन, करीना कपूर, कोंकणा सेन शर्मा आणि विवेक ओबेरॉय हे देखील सहकलाकार होते. तर कलयुग या अॅक्शन चित्रपटात कुणाल खेमू मुख्य भुमिकेत होते.

अमृता सिंहसोबतच या चित्रपटात इमरान हाशमी आणि स्माइली सूरी आणि आशुतोष राणा यांचा समावेश होता. त्यानंतर सैफ अली खानने 2004 साली अमृता सिंह यांच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांचे दोन्ही मुलं सारा आणि ईब्राहीम हे आई अमृता सिंह सोबत राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...