आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार उधम सिंग:चित्रपटात विकी कौशल दोन लूकमध्ये दिसणार, तरुण उधम सिंह दिसण्यासाठी 12 ते 15 किलो वजन कमी केले, कॉलर बोन दिसू लागले होते

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे शूटिंग जालियनवाला बागमध्ये झालेले नाही

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट 'सरदार उधम सिंग' येत्या ऑक्टोबर महिन्यात ओटीटीवर रिलीज होत आहे. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक उधम सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपट 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. त्यावेळी जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओडॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे.

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, "हत्याकांडाची घटना 1919 मध्ये घडली, तेव्हा उधम सिंग अवघ्या 21 वर्षांचे होते. 1934 मध्ये म्हणजे वयाच्या 35 व्या वर्षी उधम सिंग जनरल ओडॉयरला मारण्यासाठी लंडनला पोहोचले होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे 1940 मध्ये त्यांनी जनरल ओडॉयरची हत्या केली होती. यामुळे विकी चित्रपटात दोन लूकमध्ये दिसणार आहे. अमृतसर प्रवासात विकी 21 वर्षीय उधम सिंग यांच्या भूमिकेत सडपातळ रुपात दिसणार आहे, तर 1940 मध्ये 41 वर्षीय उधम यांच्या भूमिकेत तो दिसणार आहे.'

विकी या चित्रपटात दोन लूकमध्ये दिसणार आहे.

चित्रपटाच्या सूत्राने विकीच्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितले, "21 वर्षीय उधम सिंग दिसण्यासाठी विकीने कठोर परिश्रम घेतले. अमृतसरच्या शेड्युलमध्ये त्याला लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले होते. खाण्यात तो फक्त बिस्किट घेत होता. याचा परिणाम म्हणजे त्याचे कॉलर बोन दिसू लागले होते. गाल आणि डोळे खोल गेले होते. ज्याप्रकारे 'सरबजीत' या चित्रपटात रणदीप हुड्डा दिसला होता. तर लंडनमध्ये जेव्हा उधम सिंग जनरल ओडायरला मारण्यासाठी गेले होते, त्या लूकसाठी विकीने त्याचे स्नायू बळकट केले होते. या लूकसाठी त्याला पुन्हा वजन वाढवावे लागले होते. एकूणच विकीने 15 ते 16 किलो वजन कमी केले आणि नंतर ते पुन्हा वाढवले."

चित्रपटाचे शूटिंग जालियनवाला बागमध्ये झालेले नाही
सूत्रांनी सांगितल्यानुसार, निर्मात्यांनी अमृतसरच्या शाळेत या चित्रपटातील जालियनवाला बागचा सीन शूट केला आहे. हे शूटिंग महिनाभर चालले. निर्मात्यांनी प्रत्यक्ष जालियनवाला बाग लोकेशनवर चित्रपटाचे शूटिंग केले नाही, कारण आजच्या काळात ते ठिकाण पूर्णपणे बदललेले आहे. 1919 जालियनवाला बागमधील ठिकाणांची नावे उर्दूमध्ये होती. आज ती इंग्रजीत आहे. ते आता पर्यटन स्थळ जास्त वाटते. अशा स्थितीत अमृतसरमधील एका सरकारी शाळेचे बुकिंग एका महिन्यासाठी करण्यात आले होते. त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.'

जालियनवाला बाग जवळच्या जुन्या बाजारासाठी निर्मात्यांनी गोल्डन टेंपलच्या मागे असलेल्या बाजारात चित्रीकरण केले. तेथे ब्रिटिशांनी परेड मार्ट केले होते. ते सर्व सिक्वेन्स तेथे चित्रीत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...