आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या फक्त आठवणी:सरोज खान यांना वाटले माधुरी '1,2,3...' गाण्यावर नाचू शकणार नाही, पण धक-धक गर्लने मास्टरजींना ठरवले होते चुकीचे 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या करिअरमध्ये सरोज खान यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

जर माधुरी दीक्षितच्या गाजलेल्या गाण्यांविषयी बोलायचे झाले तर सर्वप्रथम आपल्या मनात येतं ते 1988 साली आलेल्या तेजाब या चित्रपटातील '1,2,3...' हे गाणे. शुक्रवारी या जगाला कायमचा निरोप देणा-या मास्टरजी सरोज खान यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले होते.

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या करिअरमध्ये सरोज खान यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. दोघींनी एकत्र अनेक हिट गाण्यांवर काम केले, पण '1,2,3 ...' या गाण्यावर माधुरी चांगली नाचू शकणार नाही, असे सुरुवातीला सरोज खान यांना वाटले होते. पण माधुरीने त्यांना चुकीचे सिद्ध केले. एका मुलाखतीत माधुरीने याबद्दल सांगितले होते.

मी वेस्टर्न डान्स करू शकत नाही असे सरोज यांना वाटले होते : बीबीसी एशियन नेटवर्कसोबतच्या बातचीतमध्ये माधुरीने खुलासा केला होता की, 'मी सरोज खान यांच्यासोबत 'उत्तर-दक्षिण 'आणि' राम लखन' या चित्रपटांमध्ये काम केले होते. मी पारंपारिक नृत्य चांगले करू शकले, हे सरोज यांना माहित होते, पण त्या म्हणायच्या की, ही मुलगी वेस्टर्न डान्स करू शकत नाही.'

  • मग '1,2,3...' गाण्यात वेस्टर्न डान्स करुन माधुरीने सरोज खान यांना चुकीचे कसे सिद्ध केले?

या प्रश्नाचे उत्तर देताना माधुरी म्हणाली होती, “आम्ही गाण्याचे शूटिंग करण्यापूर्वी बरीच रिहर्सल केली होती. हाच तो काळ होता जेव्हा बॉलिवूड डान्सिंग स्टाईल म्हणजे काय हे मी शिकले होते. मला वाटते की, '1,2,3...' गाण्यात मी उत्तम काम केले, पण सरोजजी शिवाय हे शक्य नव्हते.'

शेवटचा चित्रपट माधुरीबरोबर : सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटातील आहे. या मल्टिस्टारर चित्रपटातील  ‘तबाह हो गये’ हे गाणे त्यांनी कोरिओग्राफ केले होते. या गाण्यात त्यांचा आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित थिरकली होती.

माधुरीने व्यक्त केले दुःख : सरोज खान यांच्या निधनाने माधुरी खूप दु: खी झाली आहे. तिने सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’, असे माधुरी दीक्षित म्हणाली आहे.  

बातम्या आणखी आहेत...