आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अलविदा मास्टरजी:सुशांतसाठी होती सरोज खान यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, निधनावर दुःख व्यक्त करताना लिहिला होता भावनिक संदेश 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 दिवसांपूर्वी सरोज खान यांनी शेवटची इंस्टाग्राम पोस्ट टाकली होती.

बॉलिवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 14 जूनची आहे. या दिवशी सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले होते. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी या तरुण अभिनेत्याच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता.

सुशांतसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये सरोज यांनी लिहिले होते, 'सुशांत सिंह राजपूत मी तुझ्याबरोबर कधीच काम केले नाही, परंतु आपण बर्‍याचदा भेटलो. तुझ्या आयुष्यात काय अडचण होती? मला हैराण आहे की, तू आपल्या आयुष्यात एवढे टोकाचे पाऊल उचलले. तू आपल्या वडिलधा-यांशी बोलायला हवे होते, ज्याने तुला मदत केली असती आणि मग आम्ही तुला आनंदी बघू शकलो असतो', असे त्या म्हणाल्या होत्या. 

त्यांनी पुढे लिहिले होते, 'तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्या वडील आणि बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझ्या सांत्वना त्यांच्यासोबत आहेत. मी तुझ्या सर्व चित्रपटांना  प्रेम दिले आणि तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन,' अशा शब्दांत सरोज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 

  • शेवटचे गाणे माधुरीसोबत

सरोज खान यांनी आपल्या करिअरमध्ये दोन हजारांहून अधिक गाणी कोरिग्राफ केली होती. ज्यामुळे त्यांना नृत्यदिग्दर्शनाच्या बाबतीत 'मदर ऑफ डान्स' देखील म्हटले जाते. 2019 मध्ये आलेल्या 'कलंक' या चित्रपटातील 'तबाह हो गया...' या गाण्यात त्यांनी माधुरी दीक्षितला कोरिओग्राफ केले होते. याचवर्षी 15 मे रोजी माधुरीला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. 

  • 24 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

24 जूनपासून सरोज खान आजारी होत्या. त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती जी निगेटिव्ह आली. शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

0