आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील सरोज खान:धाकटी मुलगी सुकैना म्हणाली, 'ती आमच्यासाठी आई आणि वडील दोन्ही होती, पुरुषांप्रमाणे घरातील जबाबदा-या सांभाळल्या'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोज खान यांची धाकटी मुलगी सुकैनाने आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.

बॉलिवूडचा प्रख्यात नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे 3 जुलै रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सरोज खान यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चार दशकं काम केले. यावेळी सरोज यांच्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यांच्या प्रवासावर त्यांची धाकटी मुलगी सुकैनाने एका मुलाखतीत बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत.

माझी आई आमच्यासाठी हीरो होती : आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देताना सुकैनाने पिंकविलाबरोबर बोलताना सांगितले, 'माझी आई एक नायक होती. तिचा माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव होता. ती माझ्यासाठी आई आणि वडील या दोघांचीही भूमिका निभावत होती. ती माझ्यावर कठोर नव्हती परंतु मी परिपूर्ण व्हावे अशी तिची अपेक्षा होती.'

सुकैना पुढे म्हणाली, 'मी भावंडांमध्ये सर्वात लहान होती, म्हणून मला सर्वात जास्त प्रेम मिळाले. माझी आई एक फायटर होती.  वयाच्या 13 व्या वर्षापासून ते  71 व्या वर्षापर्यंत तिने आम्हाला चांगले आयुष्य देण्यासाठी सर्वकाही केले. तिने कधीही तक्रार केली नाही आणि एका पुरुषाप्रमाणे घरातील सर्व जबाबदारी उचलली.'

एकटीने मुलांना वाढवले : सरोज खान यांचे वयाच्या 13 व्या वर्षी लग्न झाले आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग त्यांनी एकटीने मुलांचा
सांभाळ केला.

याविषयी सुकैना म्हणाली, 'एकटीने मुलांना लहानाचे मोठे करणे हे एक आव्हान असते. यासह, जेव्हा कुटुंबातील इतर सदस्य देखील तुमच्यावर अवलंबून असतील, तेव्हा अडचणी आणखी वाढतात. पण, आईने कधीही हिंमत हारली नाही. ती म्हणायची, मी आहे. सर्व होईल.  जेव्हा तिला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला तेव्हा ती घाबरुन गेली नाही आणि मला शक्य नाही असेही म्हटले नाही. तिने नेहमी आम्हाला पुढे नेले.' 

प्रकृतीत सुधारणा होत होती : सुकैना सरोज खान यांच्या प्रकृतीविषयी बोलताना म्हणाली, श्वसनाच्या त्रासामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्रीपर्यंत, तिच्या प्रकृतीत
सुधारणादेखील होत होती. परंतु नंतर मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...