आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा निरोप:लुधियानात कोविड प्रोटोकॉलमध्ये झाले सतीश कौल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, स्वतःचे घर खरेदी करण्याची इच्छा राहिली अपूर्ण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लुधियानामधील मॉडेल टाऊन स्मशानभूमीत सतीश कौल यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पंजाबी चित्रपटसृष्टीतील अमिताभ आणि बी.आर चोप्रा यांच्या महाभारतात देवराज इंद्रची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांच्यावर पार्थिवावर कोविड प्रोटोकॉलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. लुधियानामधील मॉडेल टाऊन स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सतीश यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे अगदी मोजके लोक त्यांच्या अंत्यसंस्कार सहभागी झाले होते. त्यांची मानलेली बहीण सत्या देवी यावेळी हजर होती.

300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणा-या 74 वर्षीय सतीश यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शेवटचे दिवस व्यतीत केले होते. या काळात सरकारकडून किंवा इंडस्ट्रीकडून त्यांना कुठलीच मदत मिळाली नाही. इतकेच नाही तर लुधियानातील एका चॅरिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सतीश यांना अभिनयात पुनरागमन करायचे होते आणि स्वतःचे घर घ्यायचे होते

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान सतीश यांनी एका मुलाखतीत आपल्या बिकट परिस्थितीविषयी सांगितले होते. सतीश म्हणाले होते, “औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा असे मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केले. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे.”

सतीश कौल यांनी स्वतःसाठी घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, 'मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. सगळं काही संपलेले नाही. मला कोणीतरी काम घावे ही अपेक्षा आहे. मी कोणतीही भूमिका करू शकतो. मला पुन्हा अभिनय करायचा आहे,' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

सतीश कौल यांनी महाभारताव्यतिरिक्त 'विक्रम और बेताल' या कार्यक्रमातही काम केले होते. तसेच 'प्यार तो होना था था' आणि 'आंटी नंबर 1' सारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. सतीश कौल 2011 मध्ये मुंबईहून पंजाबमध्ये गेले आणि त्यानंतर तेथे अभिनय शाळा सुरु केली होती. 2015 मध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्यानंतर जे काम सुरु होते ते त्यांना थांबवावे लागले होते. दोन वर्ष ते रुग्णालयात होते. नंतर त्यांना वृद्धाश्रमात जावे लागले. तिथे त्यांनी दोन वर्षे घालवली होती.

बातम्या आणखी आहेत...