आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर:रशियन मुली आणि ब्ल्यू पील्सचा वापर करुन सतीश कौशिक यांची हत्या?

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता त्यांच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. उद्योजक विकास मालू यांची पत्नी शान्वी मालूने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. सतीश कौशिक यांच्या हत्येसाठी विकास मालू यांनी रशियन मुलीचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासा शान्वी मालू यांनी केला आहेत. शान्वी मालू यांच्या आरोपांनंतर विकास मालू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र सान्वी मालू यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.

एका मुलाखतीत शान्वी मालू हिने सतीश कौशिक यांच्या निधनानंतर धक्कादायक खुलासा केला आहे. शान्वी म्हणाली, ‘सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्यात पैशांवरुन वाद होते. गेल्या वर्षी दोघांचे वाद झाले. सतीश यांनी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते, स्वतःचे पैसे सतीश परत मागत होते. पण विकास यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी काहीही नव्हते. विकास तेव्हा परदेशात होते.'

शान्वी मालूने पोलिसांना लिहिलेले पत्र
शान्वी मालूने पोलिसांना लिहिलेले पत्र

शान्वी पुढे म्हणाली, 'भारतात आल्यानंतर तुमचे पैसे परत करेल असे विकास म्हणाले. पण कोरोना काळात मोठे नुकसान झाल्यामुळे 15 कोटी परत करण्यासाठी विकास असमर्थ होते. एवढंच नाही तर, सतीश सतत पैशांची मागणी करत आहेत, त्यांची हत्या करण्यासाठी मी ब्ल्यू पील्स आणि रशियन मुलीचा वापर करणार असल्याचे देखील विकास यांनी मला सांगितले.' शान्वी यांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

विकास मालू यांच्या फार्महाऊसवर पोहोचले पोलिस
दिल्लीत विकास मालू यांच्या ज्या फार्महाऊसमध्ये पार्टी सुरु होती, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी रविवारी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फार्महाऊसमधून दिल्ली पोलिसांनी काही औषधे जप्त केली आहेत. यामध्ये सतीश यांची नियमीत ओषधे होती. याशिवाय काही औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

विकास मालू यांनी फेटाळले सर्व आरोप
या प्रकरणी विकास मालू यांनी पत्नीचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, 'माझी चूक असेल तर मी काहीही सहन करायला तयार आहे. शान्वीकडे माझ्याविरुद्ध पुरावे असतील तर दाखवा.'

एएनआयसोबत बोलताना विकास मालू यांनी सांगितले, "सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मॅनेजर संतोषला फोन केला. रात्री 12.20 च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयाच्या गेटवरच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री 9.15 वाजताच्या सुमारास आम्ही एकत्र जेवण केले होते. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. तोपर्यंत ते अगदी नॉर्मल होते. 7 मार्चला मुंबईत होळी झाल्यानंतर 8 मार्चला माझ्याकडे मी पार्टी ठेवली होती. सतीश कौशिक आणि माझे फार जुने संबंध आहेत. ते माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना नेहमी हजेरी लावायचे", असे विकास मालू यांनी सांगितले.

पत्नीने केलेल्या आरोपांवर उत्तर देत ते म्हणाले, "माझे पत्नीबरोबर वाद असल्याने ती असे वागत आहे. मीडियामधून तिला प्रसिद्धी हवी आहे. यात मी काहीही करू शकत नाही. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. मी जर चुकीचा असेन, तर त्यास सामोरे जाण्यास मी तयार आहे."

बातम्या आणखी आहेत...