आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश कौशिक मृत्यूच्या चौकशीसाठी दिल्ली फार्महाऊसवर पोहोचले पोलिस:कर्मचाऱ्यांची चौकशी; पत्नीच्या आरोपांवर मालू म्हणाले- पुरावे दाखवा

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र 8 मार्चचे आहे. दिल्लीतील एका फार्म हाऊसमध्ये आयोजित एका होळी पार्टीत सतीश कौशिक सहभागी झाले होते.  - Divya Marathi
हे छायाचित्र 8 मार्चचे आहे. दिल्लीतील एका फार्म हाऊसमध्ये आयोजित एका होळी पार्टीत सतीश कौशिक सहभागी झाले होते. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनाच्या एक दिवस आधी कौशिक व्यावसायिक विकास मालू यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. दरम्यान सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस रविवारी रात्री उशिरा सतीश मालू यांच्या फार्महाऊसवर पोहोचले. पोलिसांनी येथील रजिस्टर तपासून फार्म हाऊसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

या फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांची पत्नी शान्वी मालू यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कौशिक यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आता शान्वीचा जबाब नोंदवणार आहेत.

उद्योगपती विकास मालू (डावीकडे) आणि सतीश कौशिक चांगले मित्र होते.
उद्योगपती विकास मालू (डावीकडे) आणि सतीश कौशिक चांगले मित्र होते.

विकास मालू यांनी या प्रकरणाबाबत एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे.

विकास मालू म्हणाले- शान्वीकडे पुरावे आहेत मग दाखवा
या प्रकरणी विकास मालू यांनी पत्नीचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, 'माझी चूक असेल तर मी काहीही सहन करायला तयार आहे. शान्वीकडे माझ्याविरुद्ध पुरावे असतील तर दाखवा.'

एएनआयसोबत बोलताना विकास मालू यांनी सांगितले, "सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मॅनेजर संतोषला फोन केला. रात्री 12.20 च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयाच्या गेटवरच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री 9.15 वाजताच्या सुमारास आम्ही एकत्र जेवण केले होते. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. तोपर्यंत ते अगदी नॉर्मल होते. 7 मार्चला मुंबईत होळी झाल्यानंतर 8 मार्चला माझ्याकडे मी पार्टी ठेवली होती. सतीश कौशिक आणि माझे फार जुने संबंध आहेत. ते माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना नेहमी हजेरी लावायचे", असे विकास मालू यांनी सांगितले.

पत्नीने केलेल्या आरोपांवर उत्तर देत ते म्हणाले, "माझे पत्नीबरोबर वाद असल्याने ती असे वागत आहे. मीडियामधून तिला प्रसिद्धी हवी आहे. यात मी काहीही करू शकत नाही. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. मी जर चुकीचा असेन, तर त्यास सामोरे जाण्यास मी तयार आहे."

दरम्यान, विकास मालूंच्या पत्नीने पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. "विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे 15 कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली," असे त्यांची पत्नी म्हणाली आहे.

सतीश कौशिक यांच्या पत्नी म्हणाल्या – विकासच्या पत्नीचे आरोप निराधार आहेत
अभिनेते सतीश कौशिक यांच्या हत्येचा दावा त्यांची पत्नी शशी यांनी फेटाळून लावला असून शान्वीला केस मागे घेण्यास सांगितले आहे. शशी यांनी सांगितले की, होळीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी त्यांचे पती विकास मालूच्या दिल्लीतील फॉर्म हाऊसवर गेले होते. दोघेही चांगले मित्र होते.

विकास स्वतः खूप श्रीमंत आहे मग त्यांना सतीशकडून पैसे घेण्याची गरज काय, असा सवाल शशी यांनी केला आहे. शशी म्हणाल्या की, पोस्टमार्टम अहवालात सतीश कौशिक यांना 98 टक्के ब्लॉकेज असल्याची पुष्टी झाली आणि त्यांच्या नमुन्यात कोणतेही औषध नव्हते. ड्रग्ज देऊन त्यांची हत्या झाल्याचा दावा ती कशी करत आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर ती त्यांची बदनामी का करत आहे? यामागे तिचा काही अजेंडा आहे, असे शशी म्हणाल्या आहेत.

आता वाचा शान्वी मालूचे 5 आरोप...

1. सतीश यांची हत्या ड्रग्जच्या माध्यमातून करण्यात आली
शान्वीने शनिवारी दिल्ली पोलिस आयुक्त कार्यालयात पतीविरोधात तक्रार दाखल केली. शान्वीचा आरोप आहे की, सतीश यांनी तिच्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते, ते आता पैसे परत मागत होते. तिच्या पतीला हे पैसे द्यायचे नव्हते. सतीश कौशिक यांची हत्या तिच्या पतीनेच काही औषधांच्या माध्यमातून केली.

2. सतीश कौशिक यांची ओळख पतीनेच करून दिली
शान्वीने सांगितले की, 13 मार्च 2019 रोजी व्यापारी विकाससोबत तिचे लग्न झाले होते. विकासनेच तिची सतीश कौशिक यांच्याशी ओळख करून दिली होती. एवढेच नाही तर सतीश यांच्याशी अनेकदा दुबई आणि भारतात भेट झाली होती.

3. सतीश आणि तिच्या पतीमध्ये पैशावरून भांडण झाले
शान्वीने आरोप केला की, 23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते आणि त्यावेळी त्यांनी तिच्या पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली होती. तिने पुढे सांगितले, मी ड्रॉईंग रूममध्ये होते, तिथे सतीश आणि विकास यांच्यात वाद झाला. कौशिक यांनी तीन वर्षांपूर्वी हे पैसे गुंतवणुकीसाठी दिले होते, मात्र ते पैसे गुंतवले गेले नाहीत आणि त्यांना परतही मिळाले नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कौशिक यांनी म्हटले होते. सतीश यांनी पैसे मागितले पण विकास देण्यास नकार देत होता.

4. पतीने दुबईत पार्टी दिली, दाऊदचा मुलगा तिथे उपस्थित होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शान्वीने दुबईमध्ये झालेल्या पार्टीचा फोटोही शेअर केला आहे. त्या पार्टीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही उपस्थित असल्याचा दावा तिने केला आहे. तिने सांगितले की, जेव्हा मी माझ्या पतीला काय प्रकरण आहे असे विचारले तेव्हा त्याने सांगितले की, कोविड दरम्यान सतीशकडून घेतलेले पैसे संपले. तिने सांगितले की, तिच्या पतीने तिला सांगितल्यानुसार, त्याला सतीशपासून स्वतःची सुटका करायची असून यासाठी तो योजना आखत आहे.

5. विकास हा ड्रग्जचा व्यापार करायचा
विकास मालू विविध प्रकारच्या ड्रग्जचा व्यवसाय करतो, असा दावा शान्वीने केला आहे.

सतीश कौशिक प्रकरणात पुढे काय होणार?

  • दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पोलिस निरीक्षकांना या आरोपांची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दावा करणाऱ्या महिलेला तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येईल.
  • फार्महाऊसवर आयोजित पार्टीत सहभागी झालेल्या 25 जणांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कार्डियाक अरेस्टनेच सतीश कौशिक यांचा मृत्यू:पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा, फार्म हाऊसच्या 7 तासांच्या CCTV फुटेजचा तपास होणार

अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. या अहवालानुसार कौशिक यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टने झाला. हा अहवाल मिळाल्यानंतर पोलीस त्या फार्म हाऊसवर पोहोचले जिथे सतीश यांनी मृत्यूपूर्वी होळी पार्टीला हजेरी लावली होती. पोलिसांनी येथून सात तासांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ताब्यात घेतले आहे. तसेच, पार्टीच्या पाहुण्यांची यादी तपासली जात आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...