आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे काल म्हणजेच 9 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांचा पुतण्या निशांत कौशिक यांनी दिव्य मराठीला सांगितले की, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. दिल्लीत एका कौटुंबिक कार्यक्रमात गेल्यानंतर रात्री त्यांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान, त्यांचा एक वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते व्यायाम करताना दिसत आहेत.
जिममध्ये घाम गाळताना दिसले सतीश कौशिक
सतीश कौशिक अनेकदा त्यांचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत होते. या व्हिडिओमध्ये वयाच्या 66 व्या वर्षीही ते जिममध्ये मेहनत करताना दिसत आहेत. त्यांच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि दररोज सकाळी मॉर्निंग वॉक देखील जायचे.
अखेरच्या प्रवासात अनेक स्टार्स सहभागी झाले
सतीश कौशिश यांच्या शेवटच्या प्रवासात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते, ज्यामध्ये जॉनी लीव्हर, अर्जुन कपूर, राकेश रोशन, रणबीर कपूर, बोनी कपूर, अनुपम खेरपासून ते राज बब्बरपर्यंतचे सर्व सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.
नीना गुप्ता यांनी व्हिडिओ शेअर करून व्यक्त केला शोक
सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सेलेब्स आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, नीना गुप्ता यांनीही एक व्हिडिओ शेअर करून त्यांची आठवण काढली.
या व्हिडिओमध्ये नीना म्हणतात, 'मित्रांनो, आज सकाळी मी खूप वाईट बातमीने उठले. या जगात एकच माणूस होता जो मला नॅन्सी म्हणायचा आणि मी त्याला 'कौशिकन' म्हणायचे. दिल्लीत कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही बराच काळ एकत्र होतो. खूप वाईट झाले, त्याची लहान मुलगी वंशिका, त्याची पत्नी शशी यांच्यावर खूप कठीण वेळ आहे आणि त्यांना काही हवे असेल तर मी त्यांच्यासाठी सदैव आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.