आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा66 वर्षीय अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री 1.30 वाजता दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 8 मार्च रोजी दिल्लीत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेथे रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात नेले असता दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांचे पुतणे निशांत कौशिक यांनी सांगितले की, त्यांना आयुष्यात प्रथमच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 ते 6 या वेळेत वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिल्लीच्या दीनदयाल रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आणले जाईल, त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील.
रोज मॉर्निंग वॉकला भेटायचे, सतीश आता नाहीत यावर विश्वास बसत नाही
सतीश कौशिक यांच्यासोबत रोज फिरणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांनी सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. उरी आणि वेबसीरिज मिर्झापूरचे अभिनेता अनिल जॉर्ज म्हणाले की, सतीश रोज गार्डनमध्ये फिरताना भेटायचे आणि शेवटची भेट होळीपूर्वी झाली होती. त्यांनी म्हटले की, या बातमीने मलाही आश्चर्य वाटत आहे, कारण सतीश रोज बराच वेळ चालत असत, अशा परिस्थितीत त्यांच्या फिटनेसबद्दल कधीही शंका नव्हती. टीव्ही अभिनेता नरेश गोसाई म्हणाले - सतीश असे निघून जातील यावर माझा विश्वास बसत नाही. ते फिटनेसबाबत खूप सजग होते. ते आनंदी होते आणि मित्रांसोबत छान बॉन्डिंग शेअर करत होते.
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला लॉन्च करणार होते सतीश कौशिक...
सतीश कौशिक यांनी कागज-2 चे शूटिंग पूर्ण केले होते. यात दर्शन कुमार, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. यापूर्वीच्या भागात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय सतीश कौशिक कागज-3 चीही घोषणा करणार होते. यासोबतच आणखी 2 चित्रपट दिग्दर्शिक करणार होते. ते त्यांचं शूटिंग सुरू करणार होते. सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलालाही ते लॉन्च करणार होते. त्यांचा पुतण्या निशांत कौशिक याने या सर्व माहितीला दुजोरा दिला. सतीश कौशिक हंसल मेहताच्या वेबसीरिज स्कॅम-2 मध्येही झळकणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी होळीच्या पार्टीत फिट वाटत होते
7 मार्च रोजी सतीश कौशिक जावेद अख्तर यांनी जानकी कुटीर जुहू येथे आयोजित केलेल्या होली पार्टीत सहभागी झाले होते. त्याने या सेलिब्रेशनचे फोटो ट्विट केले होते, ज्यामध्ये तो फिट दिसत होता. त्यांनी लिहिले- 'जावेद अख्तर, शबाना आझमी, बाबा आझमी, तन्वी आझमी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत रंगीबेरंगी होळीचा आनंद लुटला. अली फजल आणि ऋचा चढ्ढा हे नवविवाहित जोडपे भेटले. सर्वांना होलीच्या शुभेच्छा."
अनुपम खेर म्हणाले - तुझ्याशिवाय आयुष्य आता पूर्वीसारखे राहणार नाही
अनुपम खेर, सतीश कौशिक श्रद्धांजली वाहताना म्हणाले, 'माहिती आहे, मृत्यू या जगाचे अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट मी कधी माझा जिवलग मित्र #SatishKaushik यांच्याविषयी लिहिले, असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम!! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम शांति!'
हरियाणात जन्म, शालेय शिक्षण दिल्लीत झाले
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोडी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. दोन वर्षांचा असतानाच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
मिस्टर इंडियातून खरी ओळख मिळाली
सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. ते एक अभिनेता, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते. सतीश कौशिक यांना 1987 मध्ये आलेल्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातून अधिक ओळख मिळाली. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या दिवाना-मस्ताना मध्ये पप्पू पेजरची भूमिका केली. सतीश यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये 'साजन चले ससुराल' साठी सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
सतीश कौशिक यांच्याशी संबंधित वृत्त
सतीश कौशिक यांचे 66 व्या वर्षी निधन:कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते; रात्री प्रकृती बिघडली, रुग्णालयात मध्यरात्री 1.30 वा. मृत्यू
66 वर्षीय अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 8 मार्च रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. तिथे रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मध्यरात्री 1.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
कौशिक यांचा पहिलाच चित्रपट ठरला फ्लॉप:1993 मध्ये सर्वाधिक बजेटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, मुलाच्या मृत्यूने कोलमडले
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक सतिश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिल 1967 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतिश यांचा चित्रपट प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधून शिक्षण घेतलेल्या सतिश यांना कारकिर्दीत खूप संघर्ष करावा लागला. 1980 च्या सुमारास चित्रपटांतील त्यांचा संघर्ष सुरू झाला. 1987 मध्ये मिस्टर इंडिया चित्रपटातून कॅलेंडरच्या भूमिकेतून ओळख मिळाली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
सतीश कौशिक यांच्यासोबत काय घडले?:ड्रायव्हरला म्हणाले - मला रुग्णालयात घेऊन चल!; अनुपम खेर यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी दिल्लीत एनसीआरमध्ये होते. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी येथे आले होते. बुधवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या ड्रायव्हरला मला रुग्णालयात घेऊन चल असे म्हणाले. पण रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. सतीश कौशिक यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. येथे वाचा संपूर्ण वृत्त
मुलीसाठी कोट्यवधींची संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक:निधनाने अवघ्या इंडस्ट्रीवर शोककळा, अनिल कपूर आणि अनुपम खेर होते जिवलग मित्र
ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे नुकतेच निधन झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी बराच काळ व्यतीत केला. 'मौसम' या चित्रपटातून त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ते अभिनेता तर होतेच याशिवाय यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माताही होते. त्यांच्या निधनाने देशभरातून चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटीजनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.