आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसाठी कोट्यवधींची संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक:निधनाने अवघ्या इंडस्ट्रीवर शोककळा, अनिल कपूर आणि अनुपम खेर होते जिवलग मित्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश कौशिक त्यांची कन्या वंशिकासह. - Divya Marathi
सतीश कौशिक त्यांची कन्या वंशिकासह.

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे नुकतेच निधन झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी बराच काळ व्यतीत केला. 'मौसम' या चित्रपटातून त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ते अभिनेता तर होतेच याशिवाय यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माताही होते. त्यांच्या निधनाने देशभरातून चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटीजनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

सतीश कौशिक यांनी प्रदीर्घ काळ सिने इंडस्ट्रीत काम केले. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
सतीश कौशिक यांनी प्रदीर्घ काळ सिने इंडस्ट्रीत काम केले. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

सतीश कौशिक यांनी आपल्या कॉमेडीने लाखो लोकांची मने जिंकली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे सतीश आज सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणून निघून गेल्याची सर्व चाहत्यांची भावना आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका यांच्यासाठी त्यांनी कोट्यवधींची संपत्ती सोडली आहे. त्यांना आधी एक मुलगा होता पण त्याचे वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी निधन झाले होते. यानंतर आता उतारवयात सतीश कौशिक यांना एक मुलगी झाली होती.

सतीश कौशिक यांनी जवळपास तीन दशके बॉलिवूडमध्ये घालवली. त्यांनी पूर्ण निष्ठेने काम केले. मग ते अभिनय असो वा चित्रपट दिग्दर्शन. यामुळेच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्तीही निर्माण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये होती.

सतीश कौशिक अनिल कपूर आणि अनुपम खेर हे तिन्ही अभिनेते एकमेकांचे जिगरी मित्र होते.
सतीश कौशिक अनिल कपूर आणि अनुपम खेर हे तिन्ही अभिनेते एकमेकांचे जिगरी मित्र होते.

अनुपम खेर-अनिल कपूर जिवलग मित्र

सतीश कौशिक यांनीही बॉलिवूडमध्ये चांगले मित्र कमावले होते. अनुपम खेर आणि अनिल कपूर हे त्यांचे जिवलग मित्र होते. तिघेही एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे. प्रत्येक कठीण टप्प्यावर एकमेकांना साथ द्यायचे. अनेक चित्रपटांमध्येही ते एकत्र दिसले.

सतीश कौशिक, त्यांची कन्या वंशिका आणि पत्नी.
सतीश कौशिक, त्यांची कन्या वंशिका आणि पत्नी.

फिटनेसकडे होते विशेष लक्ष

सतीश कौशिक वयाच्या या टप्प्यावरही फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत असत. ते जिममध्ये वर्कआऊट करायचे. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय होते आणि व्यायाम करताना आपले व्हिडिओ शेअर करत असत.