आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक सतिश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिल 1967 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतिश यांचा चित्रपट प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधून शिक्षण घेतलेल्या सतिश यांना कारकिर्दीत खूप संघर्ष करावा लागला. 1980 च्या सुमारास चित्रपटांतील त्यांचा संघर्ष सुरू झाला. 1987 मध्ये मिस्टर इंडिया चित्रपटातून कॅलेंडरच्या भूमिकेतून ओळख मिळाली.
कॅलेंडर बनलेले सतिश सहाय्यक भूमिकेसाठी बॉलिवूडचे नवे पर्याय बनले, पण त्याआधी ते दिग्दर्शनात उतरण्याचा प्रयत्न करत होते. 1983 मध्ये शेखर कपूरसोबत मासूम चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.
पहिला चित्रपट बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट होता, पण तो फ्लॉप ठरला.
रूप की रानी, चोरों का राजा या चित्रपटातून सतिश कौशिक यांना दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये सर्वात मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती, तर अनिल कपूर-श्रीदेवी हे प्रमुख कलाकार होते. हा त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट होता. चालत्या ट्रेनमधून हिरे चोरण्याच्या एका सीनसाठी 1992-93 मध्ये 5 कोटी रुपये खर्च आला होता. प्रचंड बजेट आणि चांगली स्टारकास्ट असतानाही हा चित्रपट चालला नाही. अपयशाने खचलेल्या सतिश यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वतः याचा खुलासा केला होता.
मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला
रील लाइफमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणाऱ्या सतिश कौशिक यांचे खरे आयुष्यही कमी दुःखद नव्हते. त्यांचा मुलगा शानूच्या मृत्यूने ते खूप दुःखी झाले होते. मृत्यूच्या वेळी शानू फक्त दोन वर्षांचा होता. यानंतर खूप दिवसांनी कौशिक यांच्या घरात आनंदाचे आगमन झाले, जेव्हा 15 जुलै 2012 रोजी सरोगसीद्वारे मुलगी वंशिकाचा जन्म झाला. त्यावेळी सतिश 57 वर्षांचे होते. मुलगा शानूच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी त्यांच्या वंशिकाच्या रुपाने सुखाचे आगमन झाले. मुलीच्या जन्माचे वृत्त शेअर करताना सतिश यांनी म्हटले होते की, "अपत्याच्या दीर्घ प्रतीक्षेचा हा शेवट आहे."
खूप अभ्यास केला पण नोकरी मिळाली नाही
एका मुलाखतीत सतिश म्हणाले होते - मला अभिनेताच व्हायचे होते, पण NSD आणि FTII मधून शिकलेला अभिनेता असूनही मला काम मिळत नव्हते. मी एका साध्या कुटुंबातून होतो. उदरनिर्वाहासाठी एका कंपनीत काम केले. तिथे माझं काम भिंतीवर टांगलेले सूत साफ करायचं होतं. मी एक वर्ष हेच केलं.
मी दिल्लीहून इथे काय करायला आलोय आणि काय करतोय, या विचाराने मन दुःखी व्हायचे. त्यानंतर सहाय्यक दिग्दर्शन केले आणि तीन प्रोजेक्टनंतर दिग्दर्शनाची ऑफर मिळाली. नियतीचा खेळच असा आहे. आपण दुसरे काहीतरी मागतो, आपल्याला दुसरे काही मिळते, परंतु माझा विश्वास आहे की आपण जे काही करू त्यासाठीॉ आपले सर्व द्यावे.
हवे तसे काम मिळाले नाही, मग स्वतःच चित्रपट बनवले
ब्रिक लेन या चित्रपटानंतर मला खूप काम मिळाले, पण मला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याची मला अजूनही खंत आहे. तेव्हा प्रसारमाध्यमे आजच्यासारखी नव्हती. कदाचित त्यामुळेच हा चित्रपट जास्त लोकांनी पाहिला नसेल. त्यांना माहितीही नाही की सतिश कौशिक असेही आहेत.
छन्नी-हातोड्याला घाबरणाऱ्या दगडाची फरशीच बनेल
संघर्षाशिवाय जगणे हे कसले जगणे. मी तरुणांसाठी एक गोष्ट शेअर करतो. दोन संगमरवरी कलाकृती एकमेकींशी बोलत होत्या. एक म्हणते की ते तुम्हाला मंदिराच्या आत घेऊन जात आहेत. सर्वजण तुझी पूजा करतील आणि माझ्यावर पाऊल ठेवून तुझ्याकडे येतील. दुसरा दगड म्हणाला की, छन्नी आणि हातोड्याने मला जी वेदना मिळाली, ती तु सहन केली नाही. गोष्टीचा अर्थ असा आहे की हातोडा आणि छन्नीला घाबरणाऱ्या दगडाच्या नशिबी फरशी होणेच आहे.
या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला
सतिश यांना 'राम-लखन' (1989) आणि 'साजन चले ससुराल' (1996) या चित्रपटांसाठी दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ते दिग्दर्शक-निर्मातेही होते. अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले सतिश त्यांच्या मजेदार संवादांसाठीही ओळखले जात.
सतिश कौशिक यांचे संस्मरणीय चित्रपट
सतिश कौशिक यांच्या संस्मरणीय चित्रपटांबद्दल सांगायचे तर, त्यांनी 'जाने भी दो यारों', 'उत्सव', 'सागर', 'राम लखन', 'स्वर्ग', 'जमाई राजा', 'अंदाज', 'साजन चले ससुराल' हे चित्रपट केले आहेत. , दीवाना मस्ताना', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'आंटी नंबर वन', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'आ अब लौट चलें', 'हसीना मान जायेगी', 'दुल्हन हम ले जाएंगे', 'हद कर दी आपने' 'क्यूंकी में झूठ नहीं बोलता', 'हम किसी से कम नहीं', 'अतिथी तुम कब जाओगे', 'उडता पंजाब' आणि 'फन्ने खान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनिल, अनुपम आणि सतिश हे त्रिकूट
सतिश बॉलीवूडमध्ये अनुपम खेर आणि अनिल कपूर या दोन लोकांच्या जवळचे होते. या तिघांची मैत्री वर्षानुवर्षे जुनी आहे. अनिल आणि सतिश कौशिक मि. इंडियापासूनचे मित्र. तर अनुपम खेर आणि सतिश यांची मैत्री 45 वर्षांची आहे. एनएसडीच्या दिवसांपासून दोघे एकमेकांसोबत आहेत. तिघेही मुंबईत असल्यावर नक्की भेटायचे. एकमेकांसोबत हसत-खेळत, कधी समोरासमोर तर कधी सोशल मीडियावर. एका आठवड्यापूर्वी अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनिल कपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, अनिल आणि मी मुंबईत असलो तर आम्ही दिवसातून दोनदा नक्कीच भेटतो. कदाचित आमचे तिसरे मित्र सतिश कौशिक यांना ही गोष्ट आवडणार नाही. या पोस्टवर सतिश यांनी लिहिले होते की, आमचे एवढे नशीब कुठे?.
जावेद अख्तर यांच्या होली पार्टीत दिसले होते, फोटोही शेअर केले
सतिश कौशिक पूर्णपणे निरोगी होते. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 7 मार्चलाही त्यांनी मोठ्या उत्साहात होळी खेळली. जुहू येथे जावेद अख्तर यांच्या होळी पार्टीत सहभागी झाले होते. त्यांने ट्विटरवर फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, नवविवाहित जोडपे अली आणि ऋचा होली पार्टीत भेटले होते. सतिश यांच्यासोबत जावेद अख्तर, महिमा चौधरी, रिचा चढ्ढा आणि अली फजल दिसले होते.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.