आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शिक सतीश कौशिक यांचा 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सतीश यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. विकास मालू यांनी 15 कोटी रुपयांसाठी कौशिक यांचा जीव घेतला, असा धक्कादायक दावा त्यांची पत्नी शान्वी मालूने केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस तपास करत आहेत. दुसरीकडे सतीश कौशिक यांचे कुटुंबीय त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या 11 वर्षीय मुलीने इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र आता अचानक वंशिकाने तिचे अकाउंट डिलिट केले आहे.
वंशिकाने डिलीट केले इन्स्टाग्राम अकाउंट
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची 11 वर्षीय मुलगी कोलमडून गेली आहे. वंशिकाला तिच्या वडिलांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. वंशिकाने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या आठवड्याभरातच त्यांच्या मुलीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. सतीश कौशिकदेखील कायम आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत आणि फोटोंमध्ये ते आपल्या मुलीला टॅगदेखील करत असत.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा पुतण्या निशांतने एका मुलाखतीत सांगितले आहे की, सतीश यांच्या जाण्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीही खूप खचल्या आहेत.
66 वर्षांचे होते सतीश कौशिक
सतीश कौशिक होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते. तिथे एका फार्म हाऊसवर आयोजित होळी पार्टीत ते सहभागी झाले होते. मात्र 9 मार्च रोजी तिथे हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधी त्यांचे निधन झाले.
मूळचे हरियाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केले. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केले. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.