आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिशा सालियन मृत्यू प्रकरण:मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्याने वकिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता आले नाही, सुप्रीम कोर्टातील सीबीआय चौकशीच्या मागणीसाठीच्या याचिकेवरील सुनावणी टळली

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचिकाकर्ते विनीत ढांडा यांचे वकील सुनावणीस उपस्थित नव्हते.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सोमवारी एका याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली. या याचिकेत दिशाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. परंतु ही सुनावणी होऊ शकली नाही. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्याने वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत.

सीबीआय चौकशीची मागणी
याचिकाकर्ते विनीत ढांडा यांचे वकील सुनावणीस उपस्थित नव्हते. त्यानंतर सीजेआय एसए बोबडे यांच्या खंडपीठाने सुनावणी तहकूब केली. दिशा मृत्यू प्रकरणाची फाईल गायब झाली आहे, असे याचिकेत म्हटले गेले आहे. तिची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जातेय.

8 जून रोजी दिशा इमारतीवरुन खाली पडली होती
दिशाचा मृत्यू संशयास्पद असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु यामध्ये आतापर्यंत कोणताही मोठा निर्णय होऊ शकला नाही. दिशा 8 जूनच्या रात्री 14 व्या मजल्यावरून खाली पडली होती, त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. .