आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादाच्या भोवऱ्यात 'सूटेबल बॉय':हिंदूंच्या भावनांना ठेस पोहचवल्याचा आरोप, भाजप नेते म्हणाले- मशिदीत क्रिएटिव्ह फ्रीडम आहे ?

रीवा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी दिले चौकशीचे आदेश

OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली मीरा नायर दिग्दर्शीत वेब सीरीज ‘अ सूटेबल बॉय’ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मध्यप्रदेशातील रीवामध्ये नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते गौरव तिवारी यांनी आरोप लावला आहे की, वेब सीरीजमध्ये हिंदूंच्या भावनांना ठेस पोहचवण्यात आली आहे. तसेच, महेश्वरच्या घाटांवर लव्ह जिहादला चालना देणारे सीन शूट करण्यात आले आहेत.

वेब सीरीजमध्ये इशान खट्टर आणि तब्बू यांच्यात रोमांस दाखवण्यात आला आहे. इशान सीरीजमध्ये मान कपूर हे पात्र साकारत आहे, तर तब्बू सईदा बाईच्या रोलमध्ये आहे. रणवीर शौरी सीरीजमध्ये वारिस तर विजय वर्मा रशीदचे पात्र साकारत आहे. सीरीजमध्ये आंतरधर्मीय प्रेमाला दाखवल्यामुळे मध्यप्रदेशातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव तिवारी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

नेटफ्लिक्सने पसरवला लव्ह जिहाद

गौरवने सीरीजमधील अनेक सीन्स आणि पोलिसांकडे केलेली तक्रार ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लोकांना नेटफ्लिक्स डिलीट करण्याची अपीलदेखील केली आहे.

याला क्रिएटिव फ्रीडम म्हणायचं

गृहमंत्र्यांनी दिली चौकशीचे आदेश

बातम्या आणखी आहेत...