आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:'स्कूबी डू' कार्टूनची निर्मिती करणारे कार्टूनिस्ट केन स्पीअर्स यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केन स्पीअर्स यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

‘स्कूबी डू’ या लोकप्रिय कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचे निधन झाले आहे. त्यांनीव वयाच्या 82 वर्षी अखेरचा श्वास घेतला. केन यांचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. गेली काही वर्षे ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात केविन आणि क्रिस ही दोन मुले, दोन सूना, पाच नातू आणि तीन पणतू आहेत.

स्पीअर्स यांचा जन्म 12 मार्च 1938 मध्ये कॅलिफोर्निया येथे झाला होता. 1969 मध्ये केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीने ‘स्कूबी डू’ या कार्टूनची निर्मिती केली होती. स्कूबी हा एक कुत्रा आहे. तो आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने विविध प्रकारच्या रहस्यांचा उलगडा करतो. हे कार्टून आपल्या जबरदस्त पटकथेमुळे लोकप्रिय झाले. स्पीअर्स यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत या कार्टूनवर काम केले. ते एक उत्तम स्केच आर्टिस होते. त्यांनी 'डायनोमुट', 'जबरजॉ' ‘फांगफेस,’ ‘मिस्टर टी,’ आणि‘सेक्टॉर’ या सीरिज बनवल्या.

बातम्या आणखी आहेत...