आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • SEBI Imposed A Fine Of Three Lakhs On Both Shilpa And Raj Kundra For Violating Insider Trading Rules, Accused Of Buying Shares Of The Company Themselves

राज आणि शिल्पाच्या अडचणीत वाढ:इनसाइडर ट्रेडिंग केल्याप्रकरणी SEBI ने ठोठावला तीन लाखांचा दंड, वियान इंडस्ट्रीजवर सेबीची कारवाई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा आणि रिपू ​​सुदन कुंद्रा (राज कुंद्रा) वियान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत.

पॉर्न प्रकरणानंतर वादाच्या भोव-यात अडकलेला उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी सतत वाढत चालल्या आहेत. आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने कुंद्रासह त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांची कंपनी 'वियान इंडस्ट्रीज'ला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अंतर्गत व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सेबीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्यांना एकूण 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो त्यांना संयुक्तपणे भरावा लागेल. शिल्पा आणि राज कुंद्रा वियान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत.

सेबीला आढळली अनियमितता
राज ऊर्फ रिपू सुदन कुंद्रा व शिल्पा शेट्टी कुंद्रा संचालक असलेल्या वियान इंडस्ट्रीजची सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये वियान इंडस्ट्रीजने 2.57 कोटी रुपयांचे 5 लाख समभाग कुंद्रा दाम्पत्यासह चार जणांना जारी केले होते. मात्र याबाबतच्या कायदेशीर नियमांचे पालन झाले नसल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. याबाबत नियामकाला कळवले नसल्याचेही सेबीने बुधवारी स्पष्ट केले.

जामिनासाठी राज कुंद्रा उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो
दरम्यान, अश्लील चित्रपट निर्मिती व वितरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राज कुंद्राची जामीन याचिका मुंबईच्या कोर्टाने फेटाळली आहे. राज कुंद्रा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आपल्या अटकेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 28 जुलै रोजी त्याची याचिका फेटाळत त्याला जामीन देण्यास नकार दिला. जामीनासाठी राज कुंद्रा आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. अटकेनंतर राज 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत होता. राजविरूद्ध ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शिल्पाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञ राज कुंद्राच्या कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी करीत आहेत. शिल्पा शेट्टी वियान इंडस्ट्रीजमध्ये डायरेक्टर पदावर होती. तसेच ज्या बँक खात्यात पोर्नोग्राफी धंद्यातून पैसे येत होते, त्या खात्याचा वापर शिल्पा शेट्टी करत होती. या कारणास्तव, शिल्पाला अद्याप या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...