आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा ट्रॅजेडी किंग:शूटिंगच्या फावल्या वेळेत क्रिकेट खेळणे पसंत करायचे, सोशल मीडियावर कायम शेअर करत असत जुन्या आठवणी, बघा दिलीप साहेबांचे काही अनसीन फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप साहेबांची काही न पाहिलेली छायाचित्रे...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. ते मागील काही वर्षांपासून आजारी होती. छायाचित्रांच्या माध्यमातून बघुयात दिलीप साहेबांच्या आयुष्याचा प्रवास...

दिलीप साहेब यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे (आता पाकिस्तानात) झाला होता. त्यांनी नाशिक येथे शिक्षण घेतले.

शूटिंगच्या फावल्या वेळेत दिलीप साहेब क्रिकेट खेळणे पसंत करत असे. या फोटोमध्ये अभिनेते मुकरी विकेट किपिंग करताना दिसत आहेत.

1950 मध्ये आलेल्या 'बाबुल' या चित्रपटाच्या सेटवर दिलीप कुमार नर्गिससोबत. 12 जून 2021 रोजी हा फोटो दिलीप साहेबांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. सोबतच हा कोणत्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आहे? असा प्रश्नदेखील चाहत्यांना विचारण्यात आला होता.

हा फोटो काही वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. यात ‘मुगल-ए-आजम’ चे दिग्दर्शक के. आसिफ, पृथ्वीराज कपूर, मधुबाला, दिलीप कुमार आणि इटालियन दिग्दर्शक रॉबर्टो रोसेलिनी हे दिसत आहेत. 'प्यार किया तो डरना क्या' गाण्याच्या शूटिंग दरम्यान हा फोटो घेण्यात आला होता.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांना लग्न करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. 'मुगल-ए-आजम'च्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील प्रेमांकुर फुलले आणि चित्रपटाच्या अखेरीस त्यांचे ब्रेकअप झाले. या चित्रपटानंतर या दोघांनीही कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.

दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी शाहरुख खान देखील उपस्थित होता. सायरा बानो यांनी एकदा असे म्हटले होते की, दिलीप साहेब शाहरुखला आपला मुलगा मानतात. कारण त्यांना स्वतःची मुलं नाहीत.

दिलीप कुमार-राज कपूर आणि देव आनंद यांना त्रिमूर्ती असे म्हटले जायचे. कारण ते 40-60 च्या दशकातील सर्वात यशस्वी स्टार्स होते. जेव्हा जेव्हा हे तिघेही पार्टीत एकत्र यायचे तेव्हा त्यांच्यातील बाँडिंग बघण्यासारखी असायची.

दिलीप साहेबांच्या 98 व्या वाढदिवशी लता मंगेशकर यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत दिलीप साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दिलीप कुमार लता दीदींना धाकटी बहीण मानत असे.

सिनेमाला 100 वर्षे पूर्ण झाल्यावर एका मासिकाने तीन सुपरस्टार्स (दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान) यांच्यासह खास फोटोशूट केले होते. हे छायाचित्र त्या स्पेशल फोटोशूटमधील आहे.

बातम्या आणखी आहेत...