आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगचा अनुभव:रागावलेल्या सीनमध्ये रघुबीर यादवला पाहून परिणीतीला हसू आवरत नव्हतं

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परिणीती चोप्रा ‘सायना’सोबतच ‘संदीप और पिंकी फरार’मध्येही दिसेल. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये तिने जाणूनबुजून रघुबीर यादवकडे न पाहता सीन पूर्ण केला. याबाबत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी सागंतात, ‘रघुबीर त्या सीनमध्ये जेव्हा-जेव्हा संवाद म्हणायला सुरुवात करायचे, तेव्हा-तेव्हा त्यांना पाहून परिणीती हसायला सुरुवात करायची. त्या सीनमध्ये परिणीतीला खूप रागावलेली दिसायचे होते. चार-पाच टेक पूर्ण केले. तेव्हा परिणीतीने रघुबीर यांच्या डोक्यावर एक खूण मनात तयार केली. कारण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहण्याची गरज भासू नये. परिणीतीकडे याशिवाय दुसरा उपायही नव्हता.

पुन्हा रघुबीरकडे पाहिले, तर तिला हसू येईल, हे तिला माहिती होते आणि शुटिंग पूर्ण होणार नाही. कारण रघुबीर पराठ्यावर अडकले होते, तर परिणीती त्यांना पाहत होती. दोघांनीही सीनच्या दरम्यान गरजेपेक्षा जास्त पराठे खाल्ले. पराठे खाता-खाता अचानक दोघांनाही उचकी सुरू झाली होती.’

अर्जुन कपूरने सांगितले, ‘मला माहित नव्हते, दिबाकर सरांनी हा शेवटचा भाग चित्रपटात ठेवला की नाही. पण, शूटिंगच्या दरम्यान आम्ही खूप मजा केली. आम्ही सर्वांनी खूप जास्त पराठे खाल्ले. तसेही माझे आणि परिणीतीचे खूप जमते.’

बातम्या आणखी आहेत...