आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:‘ए थर्सडे’मध्ये यामी गौतम साकारणार ग्रे शेड भूमिका, ‘उरी’ बघून मेकर्सनी या रोलसाठी केले तिला फायनल

अमित कर्ण, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री यामी गौतम, चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला (उजवीकडून वर ) आणि प्रेमनाथ राजगोपालन, चित्रपटाचे दिग्दर्शक बेहजाद खंबाटा (डावीकडून सर्वात खाली)
  • निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी सुचवले आहे या चित्रपटाचे नाव.

अभिनेत्री यामी गौतमला मागील दोन दिवसांत लागोपाठ दोन चित्रपट मिळाले आहेत. पहिला ‘भूत पुलिस’ आणि दुसरा ‘ए थर्सडे’. ‘भूत पुलिस’ चित्रपटगृहात झळकेल, मात्र ‘ए थर्सडे थेट ओटीटीवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात यामी ग्रे शेडमध्ये आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांनी या चित्रपटाबाबत विशेष माहिती दैनिक भास्करला दिली.

बेहजाद यांनी सांगितले, "हा चित्रपट चित्रपटगृहांसाठी नसून ओटीटीसाठी आहे. ज्याप्रमाणे एपलॉज एंटरटेनमेंटने वेब शोज तयार करून बँक केली आणि नंतर ते ओटीटीवर विकले, हा चित्रपट त्या स्वरूपाचा राहील. याचे चित्रीकरण जानेवारीत सुरू होईल. चित्रपटाची पार्श्वभूमी मुंबईची राहील.

  • यामीला समोर ठेवूनच भूमिकेची मांडणी

बेहजाद सांगतात की, ‘आमच्या चित्रपटात यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहे. यात तिची ग्रेड शेड भूमिका आहे.आतापर्यंत तिने लव्ह बर्डच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र मी तिला ‘उरी’तील रॉ अधिकाऱ्याच्या रूपात अतिरेक्यांना टिपताना पाहिले आणि तिला समोर ठेवून आपल्या चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा उभी केली. यात ती नैना या शालेय शिक्षिकेच्या भूमिकेत दिसेल. अचानक ती 16 मुलांना ओलीस ठेवते. ती असे का करते यामागे महत्त्वाचे कारण असते, ते नंतर सर्वांना समजते.

  • नीरज पांडेंच्या ‘ए वेन्सडे’शी संबंध नाही

यामीच्या या चित्रपटाचे शीर्षक निर्माते राॅनी स्क्रूवाला यांनी सुचवले होते. त्यांनी सांगितले की,हाही एक थरारपट आहे आणि‘ए वेन्सडे’ देखील असाच चित्रपट होता. मात्र या चित्रपटाचा नीरज पांडेंच्या ‘ए वेन्सडे’शी काहीच संबंध नाही. तसेच हा चित्रपटाचा बाज पूर्णत: वेगळा आहे.फक्त जॉनरच्या बाबतीत यात साम्य आहे. पटकथा आवडल्यानंतरच रॉनी यांनी यामीला या चित्रपटात आणले आहे.

  • नैनाची व्यक्तिरेखा सुरेख आहे

चित्रपटाबाबत यामी म्हणते, "बेहजादने ताकदीची व्यक्तिरेखा क्रिएट केली आहे. माझी व्यक्तिरेखा क्रूर तसेच मायाळूही आहे.उरीच्या वेळी रॉनी स्क्रूवाला कंपनीशी माझे चांगले सूर जुळले होते. आता पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे.