आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:अभिनेत्री सीमा पाहवा यांना कोरोनाची लागण, अक्षय कुमारला संसर्ग झाल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांनी स्वतःला केले आयसोलेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडवर कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे.

बॉलिवूडवर कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. आता अभिनेत्री सीमा पाहवा या देखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. स्वत: सीमा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. दुसरीकडे अक्षय कुमारला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या आगामी ‘रामसेतू’ या चित्रपटातील त्याच्या सह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांचीदेखील कोविड टेस्ट झाली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून दोघांनीही स्वत:ला आयसोलेट केले आहे. अक्षयशिवाय या चित्रपटातील 45 ज्युनियर कलाकारांनाही कोरोना झाला आहे.

प्रत्येक गोष्टीबद्दल सकारात्मक आहे
सीमा पाहवा यांनी स्वत: चा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी प्रत्येक गोष्टीबद्दल सकारात्मक आहे. रिपोर्ट देखील सकारात्मक आला आहे. मी कोविड पॉझिटिव्ह आहे आणि 14 दिवस घरी क्वारंटाइन असेल," असे त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी चाहत्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

सीमा पाहवा सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात आलिया भट्ट सोबत काम करत होत्या. काही दिवसांपूर्वीच आलियालादेखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या 'रामसेतू' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. परिस्थितीत ठीक झाल्यानंतरच पुन्हा काम सुरू होईल.

हे सेलिब्रिटीदेखील सापडले कोरोनाच्या विळख्यात

सीमा पाहवा यांच्यापूर्वी सोमवारी भूमी पेडणेकर, विक्की कौशल, गोविंदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गोविंदामध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. तो सध्या घरातच क्वारंटाइन आहे. त्याशिवाय गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, एजाज खान, बप्पी लहिरी, फातिमा सना शेख, अभिजीत सावंत, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, रणबीर कपूर, मिलिंद सोमण, सतीश कौशिक, संजय लीला भन्साळी यांचे कोरोना चाचाणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातच कार्तिक आर्यनचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही माहिती देताना त्याने लिहिले की, '14 दिवसांचा वनवास संपला आहे. पुन्हा कामावर परतलो आहे.'

टीव्ही इंडस्ट्रीवरही कोरोनाचे सावट

गेल्या काही दिवसांत केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतही अनेक सेलिब्रिटींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. भाभीजी घर पर है फेम शुभांगी अत्रे, 'गुड्डन तुमसे न हो पाएगा' फेम कनिका मान, नारायणी शास्त्री, 'ये हैं चाहेते' फेम अबरार काझी, 'कुर्बान हुआ सीरिज'चा मुख्य अभिनेता राजवीर सिंह आणि निर्माता राजन शाही यांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापूर्वी अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीची चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली होती. सध्या हे सर्व कलाकार घरी क्वारंटाइन आहेत.

बातम्या आणखी आहेत...