आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोत्साहनात्मक भाषण:एखाद्या कलावंताचे निराशेत जाणे आणि पुन्हा सावरणे, सेलेना गोमेजच्या शब्दांत; म्हणाली - जेव्हा आम्ही खरे बोलतो, तेव्हा अधिक चांगले असतो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेजची ‘ल्युपस’ या आजारामुळे किडनी खराब झाली होती. वयाच्या 23 व्या वर्षी तिच्यावर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली.

मला असे वाटते की, जेव्हा आम्ही सत्य बोलतो तेव्हा आम्ही अधिक चांगले असतो आणि हे माझे सत्य आहे. गेल्या वर्षी मी खूप मानसिक आणि भावनिक अस्वस्थ होते. या दोन्हींवरचा माझा ताबा सुटला होता, मी त्यांना नियंत्रित करू शकले नाही. मी हसण्यातही अयशस्वी झाले होते आणि सामान्यपणे गोष्टीही पाहण्यात सक्षम नव्हते. आणि असं वाटत होतं की, माझं दु:ख आणि चिंता यांनी मला संपवलं आहे... माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षणांपैकी हा एक क्षण होता. मला मदतीची अत्यंत गरज होती. हे चांगले होते की, डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, मला काय झाले आहे? हे देखील चांगले आहे की, त्यांनी माझा रोग अचूकपणे ओळखला. ज्या क्षणी मला माझ्या आजाराबद्दल कळले त्या क्षणी मला खूप भीती वाटली. पण मला आरामही मिळाला. (सेलेनाला माहिती मिळाली की तिला ‘ल्युपस’ हा आजार आहे, ज्यामध्ये एक तृतीयांश रुग्णांमध्ये नैराश्य आणि चिंताग्रस्त वाटणे हा सामान्य भाग आहे)

सेलेनाला तिच्या बेस्ट फ्रेंडने किडनी दिली.
सेलेनाला तिच्या बेस्ट फ्रेंडने किडनी दिली.

भीती अशी वाटली की, आता हे आवरण काढून टाकले गेले आहे. मला इतके वर्षे निराशा व चिंताग्रस्त का वाटत आहे? हे मला आता ठावूक झाल्याचे जाणवत होते. मला यासंदर्भात पूर्ण उत्तरे यापूर्वी कधीच मिळाली नव्हती किंवा मला याबद्दल कोणतीही माहिती नव्हती… मला अशा परिस्थितीबद्दल काहीही माहिती नव्हते. माझ्या आईने मला लहान असताना भीती आणि आव्हानांना तांेड देण्यास शिकवले. म्हणूनच मी लढा देण्याचे ठरवले.

  • मी न बिचकता लोकांची मदत मागितली

लोकांची मदत घेण्यासाठी मी खरोखरच घराबाहेर पडले. कारण मला त्याची गरज होती. मी स्वत: ला याबद्दल साक्षर केले. मी आधीच अशा परिस्थितीत कधी कठीण होते. जे लोक अशा  त्रासातून गेले आहेत, अशा लोकांशी न घाबरता बोेलले आणि इतके वाचले सुद्धा. दरम्यान, मी काही नामवंत डॉक्टरांनाही भेटले. मी या आजाराबद्दल तज्ज्ञांशी देखील बोलले. मी खरोखर भाग्यवान की, मला माझ्या प्रवासामध्ये मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांसह काही खरंच हुशार लोक मिळाले. याचा अर्थ असा नाही की, सर्व काही चांगले झाले आहे. पण मी हे नक्कीच म्हणू शकते की, वर्षभर कठोर परिश्रमानंतर मी खूप आनंदी, निरोगी आहे आणि मी माझ्या भावना आणि विचारांवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवू शकते जे यापूर्वी मी कधीही करू शकले नव्हते आणि माझ्यावर विश्वास ठेवा, हे सर्व करून मी बेहद खुश आहे.

बातम्या आणखी आहेत...