आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या घराबाहेर बॉम्ब!:अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील 3 भागात बॉम्बच्या अफवेमुळे उडाली खळबळ, फोन करणाऱ्या दोघांना अटक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी रात्री 8.53 वाजता मुंबई पोलिसांना फोन आला होता
  • गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवल्याचा निवावी कॉल शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांना आला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करत बिग बींच्या घराबाहेर BDDS (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड)ची टीम तैनात करण्यात आली. मात्र चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स यूनिटने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) स्टेशन, भायखळा आणि दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या दोन मद्यधुंद इसमांनी खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी असा दावा केला की, मुंबई पोलिस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.

शुक्रवारी रात्री 8 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास मुंबई पोलिसांना कॉल आला होता की, मुंबईमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आणि त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा या कॉलची शहानिशा करण्यासाठी लावली. शहरातील पोलिस स्टेशन यांनाही सतर्क करण्यात आले आणि त्यांनाही कॉलमध्ये सांगण्यात आलेल्या ठिकाणांवर सज्ज राहण्यास सांगितले आणि त्यांनी सुद्धा जागेची पाळत सुरू केली. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही कारण जो कॉल आला होता तो खोटा कॉल होता.

गटारी साजरी करत असलेल्या व्यक्तींनी केले होते खोटे फोन
पोलिसांनी दिलेल्या नंबरवर जेव्हा फोन केला तेव्हा त्याने समोरून आपण व्यस्त असल्याचे सांगितले आणि नंतर मोबाईल स्विच ऑफ केला त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या कॉल करणार करणाऱ्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा लोकेशनच्या आधारावर त्यांचा शोध सुरू केला आणि त्यांना कल्याण शिळफाटावरून ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा राजू अंगारे आणि रमेश शिरसाट हे दोघे गटारी साजरी करत पार्टी करत होते. हे दोघेही मित्र असून डोंबिवली येथे राहतात आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांनी मजा म्हणून हा खोटा कॉल पोलिसांना केला होता. पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा या दोघांनी आपण मद्यधुंद अवस्थेत पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी हा कॉल केल्याची त्यांनी कबुली दिली.

काही मीडिया रिपोर्टनुसार, जलसा या बंगल्या घराबाहेर पोलिसांचे पथक बॉम्बचा शोध घेत असल्याची माहिती बिग बींना नव्हती, असे सांगितले जाते.

बिग बींचा जलसा बंगला
बिग बींचा जलसा बंगला
बातम्या आणखी आहेत...