आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरणात गहना वशिष्ठला झटका:सत्र न्यायालयाने गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, आता मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या जामीनावर बाहेर आहे गहना

मॉडेल आणि 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ सध्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिच्या विरोधात मालवणी पोलिस स्टेशनमध्ये दोन पीडितांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अलीकडेच गहनाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली असता तो फेटाळून लावण्यात आला आहे. या सुनावणीवेळी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, गहनाच्या विरोधात मालवणी पोलिसांकडे एक नवीन एफआयआर दाखल झाली आहे. ही एफआयआर पोलिसांच्या गुन्हे विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे. हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच गहनाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सध्या जामीनावर बाहेर आहे गहना
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राची गहना वशिष्ठ ही आणखी एक साथीदार आहे. गहना केवळ राजच्या पॉर्न फिल्ममध्ये काम करत नव्हती तर ती या फिल्मचे दिग्दर्शनही करायची. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी 21 फेब्रुवारी 2021 रोजी गहनाला एकदा अटक केली होती. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर सध्या गहना जामिनावर बाहेर आली आहे. दरम्यान, 28 जुलै रोजी दोन पीडित अभिनेत्रींनी गहनासह चार निर्मात्यांविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

'राज कुंद्राला पाठिंबा दिल्यामुळे माझ्याविरोधात कट रचला गेला' - गहना वशिष्ठ
या प्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेतर्फे लवकरच गहनाला चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. पुन्हा अटक होऊ नये यासाठी गहनाने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्याचप्रमाणे गहनाने राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याची अटक बेकायदा असल्याचे जाहीरपणे सांगत त्याची बाजू घेतली होती. गहनाच्या मते राज कुंद्रा ज्या फिल्म करायचा त्या पॉर्न नाही तर इरॉटिक होत्या.

गहना वशिष्ठच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर बलात्काराचे खोटे आरोप लावण्यात आले आहेत. ज्या मुलीने तिला बलात्कार प्रकरणात गोवले तिचा हेतू बरोबर नाही आणि तिने तिला या आरोपांमध्ये जाणीवपूर्वक अडकवले, असे गहनाचे म्हणणे आहे.

गहनाने एका मुलाखतीत आपली बाजू मांडली. ती म्हणाली, मला 21 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली, माझा फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. त्या डिवाइसमध्ये मी त्या मुलीसोबत केलेल्या सर्व चॅट आहेत, ज्यात तिने काम दिल्याबद्दल माझे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने कामाच्या मोबदल्यात पैसे मागितले जे मी तिला दिले. पण त्यावेळी मला तिचा हेतू माहित नव्हता. फक्त पोलिसांनी माझे ते सर्व चॅट पाहावे आणि ते कोर्टात दाखवावे अशी माझी इच्छा आहे.

गहना पुढे म्हणाली, 'मला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली, मग ती मुलगी तेव्हा पुढे का आली नाही आणि तिने तक्रार का नोंदवली नाही? राज कुंद्राच्या समर्थनार्थ मी पुढे आल्यामुळे हे घडले असे मला वाटते. त्या मुलीने हे षडयंत्र रचले जेणेकरून मी सत्य बोलू नये.'

काय आहे प्रकरण?
अलीकडेच, पोलिसांनी दोन पीडितांची विधाने जारी केली होती, ज्यात गहना आणि रोवा खान यांच्यावर धमकी देऊन अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने शूट केल्याचा आरोप होता. दोन्ही मुलींनी मड आयलंड येथील एका बंगल्यात शूटिंग केल्याबद्दल सांगितले होते. पीडितेने गहना वशिष्ठवर बलात्काराचा आरोप केला होता. पीडित मुलगी 20 वर्षांची असून तिने हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका वेब सीरिजच्या शूटिंगच्या नावाखाली तिला मड आयलंडला बोलावले होते आणि मानधन म्हणून 10,000 रुपये देणार असल्याचे सांगितले होते. पीडिता म्हणाली की, मला सांगण्यात आले की गहना या शोची निर्माती आहे. ती मला भेटली आणि सांगितले की, वेब सीरिज राजा, राणीवर आधारित आहे. शूटिंग दरम्यान, मला धमकी देण्यात आली आणि जबरदस्तीने एका खोलीत नेण्यात आले, तिने तिघा जणांनी माझ्यावर बळजबरी केली. यानंतर गहनाने मला नवीन कपडे दिले आणि शूटवर जाण्यास सांगितले, मी नकार दिला तर गहनाने मला धमकी दिली.

पीडितेने सांगितल्यानुसार, गहनाने मला म्हटले की, शूटिंगसाठी 10 लाख खर्च झाले आहेत आणि जर मी शूट अर्धवट सोडले तर मला 10 लाख द्यावे लागतील. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे इतके पैसे नाहीत. यानंतर आकाश नावाचा मुलगा तेथे आला आणि त्याने माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मी गहनाला मला तेथून जाऊ दे अशी विनवणी केली, मग तिने मला धमकी दिली की, जर मी इतर कुणाला किंवा पोलिसांना शूटिंगबद्दल सांगितले तर परिणाम चांगले होणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...