आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड डिटेल:हीरा मंडीसाठी 3 महिन्यांपासून बनतोय 12 कोटी रुपयांचा सेट, मार्चपासून शूट सुरू करणार मनीषा-सोनाक्षी

अमित कर्ण5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारणावर आधारित कथा

संजय लीला भन्साळी भव्यतेसाठी ओळखले जातात. ते प्रोजेक्टच्या बजेटमध्ये कोणतीच तडजोड करत नाहीत. कोरोना काळात एकीकडे पूर्ण इंडस्ट्रीची अवस्था विकट झाली आहे, दुसरीकडे भन्साळींनी आपली भव्यता कायम ठेवली आहे, ते बजेटमध्ये कोणतीच तडजोड करत नाहीत. ते मार्चपासून आपल्या बॅनरखाली बनत असलेला पहिला वेब शो ‘हीरा मंडी’वर काम करणार आहेत. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

भन्साळीच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, ‘हीरा मंडी’मध्ये स्वातंत्र्याच्या आधीची कथा आहे, त्यात बरेच कोठे दाखवण्यात येणार आहेत, त्यांनी संगीत, शायरी आणि नाचगाणे होत असे. तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी भन्साळी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई येथील फिल्म सिटीमध्ये लाहोर येथील त्या मंडीचा सेट उभारण्याचे काम करत आहेत. तो सेट मार्चमध्ये बनून तयार होईल. यावर सेटवर भन्साळी 12 कोटी रुपये खर्च करणार आहेत.

राजकारणावर आधारित कथा
या सिरीजसाठी आतापर्यंत अनेक नावे समोर आली आहेत. यापैकी सोनाक्षी सिन्हा आणि मनीषा कोईराला यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे. ही एक स्त्रीप्रधान वेब सिरीज आहे. यात वारांगनांच्या प्रेमप्रकरणांऐवजी त्यांच्यात आपसातील राजकारण दाखवले जाणार आहे. त्यामुळे यात कोणत्याही मोठ्या अभिनेत्याला घेण्यात आले नाही. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी भन्साळी यांनी एका वर्षाचा वेळ घेतला आहे.

8 पैकी फक्त सुरुवातीच्या 2 भागांचे दिग्दर्शन करतील भन्साळी
‘हीरा मंडी’ सिरीजचे एकूण 8 भाग बनतील. यापैकी दोन भागाचे दिग्दर्शन स्वत: भन्साळी करणार आहेत. यानंतर तीन-तीन भाग त्यांचे सहायक दिग्दर्शक मिताक्षरा कुमार आणि विभु पुरी करणार आहेत. मिताक्षराने यापूर्वी पहिली वेब सिरीज ‘द एम्पायर’चे दिग्दर्शन केले होते. भन्साळी यांनी यासाठी एक वर्ष घेतले.

7 कोटींमध्ये तयार झाला होता 'गंगूबाई काठियावाडी’चा सेट
एकीकडे भन्साळी 'हीरा मंडी’च्या सेटवर 12 कोटी रुपये खर्च करणार आहेत, दुसरीकडे आलिया भट्‌टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’साठी कमाठीपुरा भागाचा सेट त्यांनी 7 कोटींमध्ये बनवला होता. खरं तर, सेटवर फक्त भन्साळीच नव्हे तर सिद्धार्थ तिवारीदेखील मोठा पैसा खर्च करत आहेत.त्यांनी आपली आगामी सिरीज ‘बाहुबली : राइज ऑफ शिवगामी’मध्ये शिवगामी साम्राज्यातील महाल आणि नगर आदी बनवण्यासाठी 9 कोटीचे बजेट फायनल केले आहे.

'बैजू बावरा’मध्ये रणवीरची वर्णी?
‘हीरा मंडी’ सिरीजचे दोन भाग दिग्दर्शित केल्यानंतर भन्साळी ‘बैजू बावरा’वर काम करणार आहेत. यात रणबीर कपूर किंवा रणवीर सिंहपैकी कुण्या एकाची वर्णी लागणार, मात्र अजून काही निश्चित झाले नाही. मात्र रणबीर मार्चपासून भूषण कुमारच्या ‘अॅनिमल’चे शूटिंग सुरू करणार आहे, तेव्हा चित्रपटात रणवीरची वर्णी लागेल असल्याचे निश्चित आहे. मात्र याविषयी अजून अधिकृत माहिती समोर आली नाही.

बातम्या आणखी आहेत...