आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग रिलीज:अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार 5 भाषांमधील 7 चित्रपट, जगभरातील 200 देशांत चित्रपट बघू शकतील प्रेक्षक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील 200 देशांमधील प्रेक्षक हे चित्रपट बघू शकणार आहेत. याची सुरुवात 29 मेपासून होत आहे.

लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून थिएटर बंद आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी आपला तयार झालेला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लॉकडाऊन उघडण्याची प्रतीक्षा करणे योग्य समजले नाही. त्यांनी आपले चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.

पुढील तीन महिन्यांत या चित्रपटांचा खास प्रीमियर प्राइम व्हिडिओवर होणार असून जगभरातील 200 देशांमधील प्रेक्षक हे चित्रपट बघू शकणार आहेत. याची सुरुवात 29 मेपासून होत आहे.   अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडिया इंडियाचे दिग्दर्शक आणि देशाचे  महाव्यवस्थापक गौरव गांधी म्हणतात- भारतीय प्रेक्षक चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आम्हाला आनंद आहे की, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या बहुप्रतिक्षित चित्रपटांचा प्रीमियर करेल. भारतातील 4000 पेक्षा जास्त शहरांसह 200 पेक्षा जास्त देशांमध्ये  या चित्रपटांना ग्लोबल रिलीज प्राप्त होईल. आम्ही यासाठी खरोखर उत्साही आहोत.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणारे चित्रपट 

पोंमागल वंदल (तमिळ)   

29 मेपासून ज्योतिका, पार्थीबान, भाग्यराज, प्रताप पोथन आणि पंडियराजन स्टारर हा एक लीगल ड्रामा आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जे.जे. फ्रेड्रिक आणि
निर्माते सूर्या आणि राजशेखर कार्पुरासुंदरपांडियन हे आहेत.
गुलाबो सीताबो (हिंदी)  12 जूनपासून अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा गुलाबो सीताबो एक कौटुंबिक कॉमेडी आहे, ज्यामध्ये सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षाचे चित्रण केले गेले आहे.
या चित्रपटाचे लेखन जूही चतुर्वेदी यांनी केले आहे. तर दिग्दर्शन शुजित सरकर यांनी केले असून त्याची निर्मिती रॉनी लाहिरी व शील कुमार यांनी केली आहे.
पेंग्विन (तामिळ आणि तेलुगू)19 जूनपासूनकीर्ती सुरेश अभिनीत पेंग्विनचे ​​लेखक आणि दिग्दर्शक ईश्वर कार्तिक आहेत. या चित्रपटाचे निर्माते स्टोन बेंच फिल्म्स आणि कार्तिक सुब्बराज आहेत.
लॉ (कन्नड)26 जूनपासूनरागिनी चंद्रन, सिरी प्रहलादा आणि दिग्गज अभिनेते सीएम चंद्रू अभिनीत लॉचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत रघु समर्थ.  तर निर्माते आहेत अश्विनी आणि पुनीत राजकुमार.
फ्रेंच बिर्याणी (कन्नड)   24 जुलैपासूनया चित्रपटात दानिश सैत, साल युसुफ आणि पितोबाश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पन्नागा भरणा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अश्विनी, पुनीत राजकुमार
आणि गुरुदत्त ए. तलवार यांनी केली आहे. याचे लेखक अविनाश बालेक्कला आहेत. 
शकुंतला देवी (हिंदी)- ह्युमन कंप्यूटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये विद्या बालन हिने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले
आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रॉडक्शन्स आणि विक्रम मल्होत्राची निर्मिती आहे.
सुफीयम सुजाथायुम (मल्याळम)-अदिती राव हैदरी आणि जयसूर्या अभिनीत या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नारानिपूझा शनावास हे आहेत. तर निर्माता आहे विजय बाबू यांचे फ्रायडे फिल्म
हाऊस. 

बातम्या आणखी आहेत...