आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जावेद यांच्या धर्मनिरपेक्षतेचा गौरव:रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय जावेद अख्तर यांच्यापर्यंत पोहोचली ट्रॉफी, पत्नी शबानाने शेअर केला फोटो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावेद म्हणाले होते - माझे विचार इतक्या दुरवर पोहोत आहेत याचे मला आश्चर्य वाटते.

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना अलीकडेच रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांनी रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराची ट्रॉफी त्यांना मिळाली आहे. याचा फोटो त्यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षतेवर तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. मानवी बौद्धीक विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी कार्य करणे आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

  • शबाना यांनी शेअर केला फोटो

शबाना यांनी फोटो शेअर करुन लिहिले, जावेद आपल्या रिचर्ड डॉकिन्स 2020 अवॉर्डसह. अख्तर आणि रिचर्ड डॉकिन्स यांनी शनिवारी एका व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे बातचित केली होती. जून 2020 मध्ये जावेद यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी शबाना आझमी यांनी या पुरस्कारासाठी त्यांचे कौतुक केले होते. हा पुरस्कार जावेद अख्तर यांच्यासाठी एका प्रेरणास्रोताचे काम करेल, असे त्या म्हणाल्या होत्या.

  • जावेद म्हणाले होते - मला आश्चर्य वाटते की...

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाले होते की, 'माझे विचार इतक्या दुरवर पोहोत आहेत याचे मला आश्चर्य वाटते. धर्मनिरपेक्ष आणि माझ्या विचारांशी जगातील अनेक जण सहमत आहेत ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे'.

यापूर्वी अमेरिकीचे कॉमेडियन बिल माहेर आणि तत्त्ववेत्ते ख्रिस्तोफर हिचेन्स यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.