आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाला पाठिंबा:'द केरला स्टोरी'ला विरोध करणाऱ्यांना शबाना आझमींनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'द केरला स्टोरी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. तर काहींनी मात्र या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी 'द केरला स्टोरी' समर्थनार्थ एक ट्वीट केले आहे. त्यांनी चित्रपटावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटावर जशी बंदीची मागणी अयोग्य होती तशीच या चित्रपटाबाबत केली जाणारी मागणी अयोग्य आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या शबाना आझमी?
शबाना आझमी यांनी 'द केरला स्टोरी'ला पाठिंबा देणारे ट्वीट केले आहेत. 'जे लोक द केरला स्टोरीवर बंदी घालण्याची चर्चा करतात ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढावर बंदी घालू पाहणाऱ्यां इतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपट पास केला की, तर कोणालाच एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी होण्याचा अधिकार नाही' असे शबाना आझमींनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाला आता माऊथ पब्लिसिटीचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. वीकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसांत चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.

'द केरला स्टोरी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. रविवारी या चित्रपटाने तब्बल 16.50 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.3 कोटी आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 12 कोटींचा गल्ला जमवला होता. अशाप्रकारे चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 35.75 कोटींची कमाई केली आहे.

'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचे धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसे सामील केले जाते हे सांगणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आहे.