आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची भाची मेघना यांना ओला कॅब ड्रायव्हरकडून आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितले आहे. ओला कॅब ड्रायव्हरने त्यांची भाची मेघना विश्वकर्मा यांना ठरलेल्या ठिकाणी न सोडता अर्ध्या रस्त्यावर सोडले आणि तेथून तो निघून गेला. ही मध्यरात्री घडलेली घटना आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना हे अजिबात मान्य करण्यासारखे नाही, असे शबाना म्हणाल्या आहेत.
शबाना म्हणाल्या - हे अजिबात मान्य करण्यासारखे नाही
शबाना आझमी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, "माझ्या 21 वर्षीय भाचीला ओला कॅबचा खूप भयानक अनुभव आला आहे. हे अजिबात मान्य करण्यासारखे नाही." शबाना यांनी त्यांच्या भाचीची फेसबुक पोस्ट लिंक शेअर केली आहे, ज्यात त्यांची भाची मेघना यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.
मेघना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली मदत
मेघना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी लोअर परळ ते अंधेरी पश्चिम अशी ओला कॅब बूक केली होती. त्या कॅब ड्रायव्हरने माझी राइड स्वीकारली आणि तो मला घ्यायला आला. यानंतर काही मिनिटांनी त्याला असे वाटले की, त्या रस्त्याला फार ट्राफिक आहे. त्याला घरी यायला उशीर होईल, म्हणून त्याने मला दादरच्या ब्रीजवर सोडले. मध्यरात्रीची वेळ असल्याने दुसरी टॅक्सी शोधणे फार कठीण होते. त्यानंतर मी तिथून चालत दादर मार्केटपर्यंत पोहोचले. त्यानंतर मला माझ्या घरी पोहोचण्यासाठी तब्बल दोन तास लागले. त्या ड्रायव्हरचे नाव मुस्तकिन खान होते. कृपया माझी मदत करा. घडलेली ही घटना मला अजिबात मान्य नाही ओला."
ओलाने दिले मेघना यांच्या पोस्टला उत्तर
ओलाने लगेच कमेंट करून मेघना यांच्या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले, "तुमच्यासाठी हा प्रवास किती वाईट ठरला असेल याची आम्हाला जाणीव आहे, अशा कुठल्या अनुभवाला तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा आम्ही कधी विचारही केला नाही. कृपया या राईडचा सीआरएन आमच्या इनबॉक्समध्ये शेअर करा. जेणेकरुन आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर मदत करू शकेल.'
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहेत शबाना
शबाना यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अलीकडेच 'शीर कोरमा' चित्रपटात दिसल्या होत्या. सध्या च्या करण जोहरच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात शबानासोबत रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.