आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:निर्माता फिरोज नाडियाडवालाला ताब्यात घेऊन NCBची चौकशी सुरु, घरातून गांजा मिळाल्यानंतर पत्नीला झाली होती अटक

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिरोज नाडियाडवाला यांना एनसीबीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सोमवारी फिरोज नाडियाडवाला यांना ताब्यात घेतले आहे. एनसीबी कार्यालयात त्यांची चौकशी केली जात आहे. यापूर्वी रविवारी त्यांची पत्नी शबाना सईदला अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. दरम्यान, एनसीबीने रिमांडसाठी शबाना यांना एनसीबी कोर्टात हजर करेल. न्यायालयात हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी शीव रुग्णालयात शबाना यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सोमवारी एनसीबीने फिरोज यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. रविवारी एनसीबीने छापा टाकला तेव्हा फिरोज नाडियाडवाला घरी नव्हते. यापूर्वी रविवारी लाँग चौकशीनंतर शबाना सईदला अटक करण्यात आली होती. या व्यतिरिक्त इतर 4 जणांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. फिरोज यांच्या घरातून एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. त्यांच्याकडून 717 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी तसेच रोकड जप्त करण्यात आली. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे.

एनसीबीने 7 व 8 नोव्हेंबरच्या रात्रीपासून अनेक ड्रग पॅडलर्सच्या घरावर धाडी टाकल्या असून आणखी 5 ड्रग पॅडलर्सला ताब्यात घेतले आहे. ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या अनेक संशियांताच्या केलेल्या चौकशीतून नाडियाडवाला यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी एनसीबीने धाडी टाकल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. फिरोज नाडियाडवाला यांनी हेराफेरी, आवारा पागल दिवाना, वेलकम, कारतूससारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

न्यायालयात हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी शीव रुग्णालयात शबाना यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
न्यायालयात हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी शीव रुग्णालयात शबाना यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
  • अर्जुन रामपालच्या घरी एनसीबीचा छापा, काही दिवसांपूर्वीच मेहुण्याला झाली होती

आतापर्यत ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे आली आहेत.या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडक कारवाई सुरु असून आता अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. तसेच या कारवाई दरम्यान अर्जुनच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीला कारवाईदरम्यान अर्जुनच्या घरात ड्रग्ज सापडले की नाही, याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही.

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केली होती. दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्कारांच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला एनसीबीने लोणावळ्यातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर आता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. दिव्य मराठीने 1 ऑक्टोबर रोजी अर्जुन रामपालच्या ड्रग्ज कनेक्शन विषयीची बातमी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...