आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हर्च्युअल कॉन्सर्ट:शाहरुखने गायले कोरोनाग्रस्तांसाठी खास गाणे; चिमुकला अबरामही साथ देत म्हणाला - सर्व काही ठिक होईल

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पीडितांच्या मदतीसाठी बॉलिवूड कलाकारांनी आयोजित केलेली 'आय फॉर इंडिया' ही व्हर्च्युअल कॉन्सर्ट रविवारी रात्री फेसबुकवर 4 तास 20 मिनिटांपर्यंत चालली.

कोरोना पीडितांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी रविवारी रात्री 'आय फॉर इंडिया' नावाच्या एका कार्यक्रमाचे फेसबुकवर आजोयन केले होते. या कार्यक्रमात शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान, प्रियांका चोप्रा, आयुष्मान खुराणा यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी भाग घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुख खानने  'सुन ना यार सब सही हो जाएगा' हे गाणे गायले. हा व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुखने लिहिले,  'आंखें खुलीं, पर दिमाग सो जाएगा, सुन ना यार, सब सही हो जाएगा’.  बाकी का वक्त पंखा देखकर बिताया, मुर्गी या अंडा, पहले क्या आया, देखो-देखो टाइम कितना बुरा चल रहा है, अब ये एसआरके सिंगर भी बन रहा है. पहले एक्टिंग से बनाया अब सिंगिंग से बनाएगा. छोड ना यार सब सही हो जाएगा” असे या गाण्याचे बोल आहेत.  हे गाणे ऐकून शाहरुखचा लहान मुलगा अबराम म्हणाला, “पापा आता खूप झालं, सर्व काही ठिक होईल.”

व्हिडिओमध्ये थिरकला शाहरुख

या व्हिडिओमध्ये शाहरुख ब्लॅक टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसतोय. त्याने गॉगल देखील लावला आहे. व्हिडिओत अबराम त्याच्यासोबत मस्ती करताना दिसतोय. गाणे संपल्यावर शाहरुख म्हणतो की, मी पुन्हा एखादे गाणे गाऊ शकतो, तर त्यावर चिमुकला अबराम त्याला म्हणतो,  'पापा आता पुरे, चला आता'.

शाहरुखच्या गाण्याचे बोल ...

शोज देख देखकर थक चुका हूं आंखें खुलीं पर दिमाग सो जाएगा सुन ना यार सब सही हो जाएगा।

रेंडम ख्यालों का पुलाव है पकाया, ये करण का हीरू लंदन से क्यों आया,  सोचते-सोचते तीन बज जाएगा,  छोड ना यार सब सही हो जाएगा।

बाकियों के मसल्स बडे जा रहे हैं, मुझसे तो पुशअप्स भी नहीं हो पा रहे हैं, कम्पेरिजन करके दिल छोटा हो जाएगा, अबे रहने दे ना यार, सब सही हो जाएगा।

'बाकी का वक्त पंखा देखकर बिताया, मुर्गी या अंडा पहले क्या था आया, देखो-देखो टाइम कितना बुरा चल रहा है, अब ये एसआरके सिंगर भी बन रहा है, पहले एक्टिंग से बनाया, अब सिंगिंग से बनाएगा, भाई लॉकडाउन ये दिन भी दिखाएगा।

टाइम का काम है चेंज होना, चेंज होगा ये सारा सिस्टम देखो फिर से रीअरेंज होगा, सिक्स पैक्स विल बी बैक, ऑन द मार्केट स्टेडियम भर के फिर से देखेंगे हम क्रिकेट फिर से दिवाली पर दीये जलाएंगे,  ईद पर ईदी लेने घर घर जाएंगे, फिर से पहनेंगे जींस, और जिप ढीली करेंगे, फिर से घर पर बैठना मिस करेंगे,  पर कुछ दिनों फिलहाल कर लो थोडा इंतजार थोड़ा और ख्याली पुलाव करो तैयार हम साथ हों तो हर मसला छोटा हो जाएगा, मेरी बात मानो सब सही हो जाएगा।'