आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग!:नीता अंबानींच्या कार्यक्रमात खरंच पत्नी गौरीशी भांडला शाहरुख खान, ओरडतानाचा व्हिडिओ व्हायरल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडसह राजकारणी, क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. उद्घाटन सोहळ्यानंतर पार पडलेल्या पार्टीचे अनेक इनसाइड व्हिडिओ आता समोर आले आहेत. दरम्यान या पार्टीतील शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी हिचा एक व्हिडिओदेखील सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत शाहरुख गौरीवर चिडून ओरडताना दिसतोय.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या इव्हेंटमध्ये शाहरुख खानने परफॉर्म केले होते. त्याच्या या परफॉर्मन्सला उपस्थितांची दाद मिळाली. त्यानंतर आता समोर आलेल्या एका व्हिडिओत शाहरुख पत्नी गौरीसोबत भांडताना दिसतोय. तो गौरीशी रागात ओरडून बोलत असल्याचे यात समोर आले आहे. शाहरुखच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील रागीट दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुख भांडतानादेखील क्यूट दिसतो, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर काहींच्या मते, तिथे म्युझिकचा आवाज जास्त असल्याने तो ओरडून बोलतोय. काहींना मात्र शाहरुखचे असं वागणे आवडलेले नाही.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्याचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता तो 'जवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो तापसी पन्नूसोबत 'डंकी' या चित्रपटातही दिसणार आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.