आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाण:व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म मोडमध्ये होत आहे 'पठाण'चे शूटिंग, शाहरुख खान आणि जॉन अब्राहम वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये चित्रीत करत आहेत आपापले अ‍ॅक्शन सीक्वेन्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या टेक्निकचा वापर पान मसालाच्या जाहिरातीसाठी करण्यात आला होता

कोविडच्या सध्याच्या परिस्थितीमुळे बिग बजेटच्या अ‍ॅक्शन चित्रपटांचे शूटिंग अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. विशेषत: अशा चित्रपटांमध्ये जिथे दोन मोठे स्टार महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत आहेत. उदाहरणार्थ, 'पठाण' या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम सारखे दोन मोठे स्टार स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. लॉकडाउन लागण्यापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म मोडमध्ये केले गेले होते. शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांनी वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये आपापले अ‍ॅक्शन सीक्वेन्स चित्रीत केले होते. नंतर पोस्ट प्रॉडक्शनमध्ये ते सीन्स मर्ज करण्यात आले. त्यानंतर हे दोघेही एकाच फ्रेममध्ये दिसतील.

या टेक्निकचा वापर पान मसालाच्या जाहिरातीसाठी करण्यात आला होता
पठाण चित्रपटाचे अ‍ॅक्शन सीन्स अशाप्रकारे चित्रीत केले जात असल्याची माहिती शाहरुख खआनचा बॉडी डबल प्रशांत वालदेनी दिली आहे. प्रशांत मागील 15 वर्षांपासून शाहरुख खानचा बॉडी डबल म्हणून काम करत आहे. प्रशांत म्हणाला, "हेच तंत्रज्ञान पान मसालाच्या जाहिरातीसाठीही वापरले गेले होते. अजय देवगणचे सीन वेगवेगळ्या वेळी चित्रीत करण्यात आले होते. त्यानंतर अजयचे सीन्स शाहरुख भाईच्या सीन्ससोबत मर्ज करण्यात आले होते आणि त्यानंतर हे दोघेही एकाच फ्रेममध्ये दिसले. हे सर्व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी केले गेले. एकाच वेळी संक्रमणाचा धोका दोन मोठ्या स्टार्सना होऊ नये, यासाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे. पान मसालाच्या चित्रीकरणासाठी शाहरुख यश राज स्टुडिओत आला होता. त्यावेळी सेटवर फक्त 20 ते 25 जणांच्या क्रू मेंबर्सने त्याच्यासोबत चित्रीकरण केले होते. ते सर्व 10 ते 20 फूटांच्या अंतरावर होते. त्याआधी शाहरुखने काही जाहिरातींचे चित्रीकरण आपल्या बंगल्यावर केले होते."

शाहरुखने 'पठाण' साठी बनवली दमदार शरीरयष्टी
प्रशांत पुढे म्हणाले, "पठाण हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. शाहरुख भाईने यासाठी एक दमदार शरीरयष्टी तयार केली आहे. माझ्या मते, पठाणनंतर शाहरुख लगेच दक्षिणेत अ‍ॅट लीचा चित्रपट करेल. जेणेकरुन पठाणसाठी बनवलेल्या बॉडीचा वापर चित्रपटातही अॅक्शनसाठी करता येईल. 'पठाण'ची व्हर्च्युअल मोडमध्ये शूटिंग होत आहे. त्याचे बरेच फायदे आहेत. याच्या माध्यमातून अभिनेत्याच्या बॅकग्राऊंडमध्ये कोणत्याही शहराचा लँडमार्क तयार करता येतो आणि त्यामुळे लाइव्ह लोकेशनवर जाण्याची गरज नाही."

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पठाणचे चित्रीकरण फिल्मसिटी आणि यशराज स्टुडिओत वेगाने झाले. शाहरुख आणि जॉन अब्राहम यांनी दोन्ही ठिकाणी शूटिंग सुरू ठेवले. 'पठाण' व्यतिरिक्त शाहरुख खानने 'ब्रह्मास्त्र'चे चित्रिकरणही केले आहे. सूत्रांनी सांगितले की, शाहरुख त्यामध्ये ब्लॅक मॅजिशिअन झाला आहे. चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे. चित्रपटात मौनी रॉय आपल्या जादूई शक्तींद्वारे शाहरुखच्या पात्राच्या सर्व शक्ती हिसकावून घेते.

बातम्या आणखी आहेत...