आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खान हा नुकताच अजय देवगन सोबत पान मसाला ब्रँडच्या एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करताना दिसले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापूर्वी कधीही शाहरुख खानने अजय देवगनसोबत काम केले नाही. अजय देवगनचा पान मसाला ब्रँडसोबत खूप जूना संबंध आहे. परंतु, समोर आलेल्या या जाहिरातीच्या व्हिडियोमध्ये हे दोन्ही अभिनेते एकत्र प्रमोशन करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सने शाहरुख खानवर मजेदार मीम्स बनवून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहे. हे सर्व मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.
या जाहिरातीतील व्हिडियोमुळे शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्सने या पार्श्वभूमीवर वेगवेगळे मजेदार मीम्स तयार करत खिल्ली उडवत आहे. शाहरुख खानच्या ब्रँड टीमने दिव्य मराठीशी बोलतांना या गोष्टीची पुष्ठी दिली की, अभिनेता शाहरुख खानने पान मसाला बँडच्या जाहिरातीमध्ये अजय देवगन सोबत एकत्र काम केले आहे.
युजर्स अशाप्रकारे शाहरुखला ट्रोल करत आहे
एक युजर्स ट्रोल करताना असे लिहले आहे की, "शाहरुख खान पान मसालाचे जाहिरात करीत आहे, जेव्हा आपण तीन वर्षापासून काम करत नाही. त्यामुळे हे असेच घडणार. गुटखा मॅन शाहरुख खान" दुसऱ्याने असे लिहले की, "जेव्हा इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक आणि निर्मात्याले दोघांना एकत्र आणणे शक्य झाले नाही, तेथे विमलने हे चमत्कार केले."
एका युजर्सने नाराजी व्यक्त करत असे लिहिले आहे की, "आम्ही तुम्हाला मीस करत 2021 मध्ये पडद्यावर पाहण्याची आशा ठेऊन होतो. परंतु, विमलच्या जाहिरातीमुळे आता आपल्यापासून अपेक्षा ठेवता येणार नाही." एका युजर्सने लिहिले की, "कॉप युनिव्हर्स, स्पा युनिव्हर्स आणि हॉरर कॉमेडी युनिव्हर्स बनल्यानंतर आता विमल युनिव्हर्सही हे नवीन आले आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.