आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता शाहरुख खान कोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात मदतीसाठी पुढे येतोय. आता त्याने महाराष्ट्र शासनाला 25000 वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) किट उपलब्ध करुन दिली आहेत. जेणेकरून राज्यभरातील मेडिकल टीमची सुरक्षा होऊ शकेल. या योगदानाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी त्याचे आभार मानले आहेत.
'शाहरुख खान यांनी 25 हजार पीपीई कीट देऊन जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल', असे ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
Many thanks Mr. Shah Rukh Khan for your kind contribution of 25,000 PPE kits. This will go a long way in supporting our fight against COVID19 & protecting our frontline medical care team @iamsrk @MeerFoundation @CMOMaharashtra
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2020
शाहरुखनेही त्यांचे आभार मानत सध्याच्या काळात सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘या किट्ससाठी तुम्ही जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. मानवजातीच्या सुरक्षेसाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढुयात. तुमची मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंबसुद्धा निरोगी व स्वस्थ राहू दे’, असे ट्विट शाहरुखने केले आहे.
Thank you sir for all your help to source the kits. We are all together in this endeavour to protect ourselves and humanity. Glad to be of service. May your family & team be safe and healthy. https://t.co/DPAc7ROh7i
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2020
यापूर्वी, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांनी वांद्रे येथील त्यांची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी मुंबई महापालिकेला दिली आहे. शाहरुख आणि गौरीने मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे विशेष आभार मानले होते.
याशिवाय शाहरुखने आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX कडून सात संस्थांना निधी देत असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय 50 हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील 5500 कुटुंबाना तसंच 10 हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी 2000 जणांचं जेवण, दिल्लीतील 2500 रोजंदारी कामगार आणि 100 अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत शाहरुखने जाहीर केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.