आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स रिहर्सल:अंबानींच्या पार्टीत 'ले गई ले गई'वर थिरकला शाहरुख खान, रिहर्सलचा व्हिडिओ आला समोर; चाहते म्हणाले - OMG राहुल परतला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या ओपनिंग सेरेमनीनंतर झालेल्या गाला पार्टीत बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खान 'दिल तो पागल है' या चित्रपटातील गाजलेल्या 'ले गई ले गई' या गाण्यावर थिरकला होता. आता त्याचा या गाण्याच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर आणि त्यांची लीड डान्सर अनिशा दलाल देखील डान्स करताना दिसत आहे.

चाहते म्हणाले - शाहरुखमध्ये खूप एनर्जी आहे
व्हिडिओत डान्स रिहर्सल करणारा शाहरुख ब्लॅक टी-शर्ट आणि लूज ट्राउजरमध्ये दिसतोय. त्याने सोबत पांढरे शूज घातले आहेत. सोशल मीडियावर शाहरुखचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. 'OMG राहुल परत आला आहे!', अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

तर एका चाहत्याने लिहिले - 'आयकॉनिक!' आणखी एक चाहता म्हणाला की, 'शाहरुखमध्ये खूप ऊर्जा आहे.'

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी शाहरुखने रणवीर सिंग आणि वरुण धवनसोबत 'झूम जो पठान' या गाण्यावर डान्स केला होता.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो नयनतारासोबत त्याचा आगामी चित्रपट 'जवान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय शाहरुख लवकरच तापसी पन्नूसोबत 'डंकी'मध्ये दिसणार आहे.