आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण तापले:शाहरुख खानने सेल्फी घेणाऱ्या फॅनचा हात झटकला, नेटकरी संतापले; व्हिडिओ व्हायरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. शाहरुख कुठेही दिसला तरी त्याच्यासोबत लोक सेल्फी काढू लागतात. असेच काहीसे एका व्यक्तीने केले. झाले असे की, शाहरुख खान नुकताच मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाला. विमानतळावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाइल काढून त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण शाहरुख त्याच्यावर संतापलेला दिसला.

हात झटकून फोटो काढण्यास केली मनाई
व्हिडिओत शाहरुख विमानतळाबाहेर पडताना दिसतोय. यावेळी एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहरुखने लगेच त्याचा हात झटकला. यामुळे त्या अज्ञात व्यक्तीच्या हातातला कोट खाली पडला आणि कदाचित फोनदेखील पडला. इतकेच नाही तर शाहरुखने त्या व्यक्तीकडे रागाने बघताना व्हिडिओत दिसतोय.

चाहते संतापले
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एकाने लिहिले- 'शाहरुख तू चाहत्यांमुळे इथे आहेस हे विसरू नकोस.' एकाने लिहिले की, 'अजून करा त्याचे चित्रपट हिट आणि त्याचा भावना आणखी वाढवा.' एकाने म्हटले की, 'आता पठाण हिट झाल्याने तो गर्विष्ठ झाला आहे.' आणखी एकाने लिहिले, 'हे सेलिब्रिटी विसरतात की त्यांना कोण सेलिब्रेटी बनवतं.' एकाने लिहिले, 'हा चाहता विमानतळावरचा कर्मचारी आहे. त्याने शाहरुखला अजिबात हात लावला नाही आणि शाहरुखने त्याचा वाईट प्रकारे अपमान केला.'

शाहरुख काही दिवसांपूर्वीच 'डंकी' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी श्रीनगरला गेला होता. येथे तो चाहत्यांच्या गराड्यात सापडला होता. गर्दीमुळे शाहरुखला धक्काबुकीदेखील झाली होती.

शाहरुखचे चित्रपट
शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट यावर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत तब्बल एक हजारांहून अधिकची कमाई केली. या चित्रपटानंतर शाहरुख लवकरच राजकुमार हिराणींच्या 'डंकी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी त्याचा एटली दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय यशराज फिल्म्सने शाहरुख आणि सलमानला एकत्र आणत 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाची घोषणा केली आहे.