आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:रेड चिलीजच्या टीम मेंबरच्या मृत्युने भावूक झालेल्या शाहरुख खानने लिहिले- माझ्या मित्रा तुझी खूप आठवण येईल 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ड्रीम्ज अनलिमिटेड'नंतर झाले 'रेड चिलीज'

शाहरुख खानने आपली प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीजचे कर्मचारी अभिजीतच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा शाहरुखने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून त्याची आठवण काढली. शाहरुखने सांगितल्यानुसार अभिजीत रेड चिलीजबरोबर सुरुवातीपासूनच जुळले होते.

रेड चिलीजच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "रेड चिलीजचे सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक असलेल्या अभिजीतच्या मृत्यूने आमच्या अंतःकरणात कधीही न भरुन निघणारी जागा सोडली आहे. आम्ही आपल्या अवतीभवती त्याला कायम लक्षात ठेऊ. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. त्याचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आमच्या सांत्वना आहेत."

शाहरुखला आठवले पहिले प्रॉडक्शन हाऊस

रेड चिलीजच्या ट्विटला री-ट्विट करुन शाहरुखने त्याचे पहिले प्रॉडक्शन हाऊस ड्रीम्ज अनलिमिटेडची आठवण काढली. त्याने लिहिले, "आम्ही ड्रीम्ज अनलिमिटेडसोबत चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. काही चांगले तर काही वाईट काम झाले. मात्र कायम पुढे जायचे, हेच आमचे धोरण आहे. कारण आमच्या टीममध्ये त्याच्यासारखे मजबूत सहकारी होते,  जे  कायम सांभाळून घ्यायचे. माझ्या मित्रा मला तुझी खूप आठवण येईल."

'ड्रीम्ज अनलिमिटेड'नंतर झाले 'रेड चिलीज' 

शाहरुखने 1999 मध्ये  त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री जूही चावला आणि अझीझ मिर्झा यांच्यासोबत मिळून ड्रीम्ज अनलिमिटेडची सुरुवात केली. त्यांच्या बॅनरखाली 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'अशोका' आणि 'चलते चलते' या चित्रपटांची निर्मिती झाली. 2003 मध्ये शाहरुखने कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि पत्नी गौरी खान यांच्यासमवेत ते रेड चिलीजमध्ये रुपांतर केले. 'मैं हूं ना' हा रेड चिलीजच्या बॅनरखाली बनलेला पहिला चित्रपट होता.

बातम्या आणखी आहेत...