आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरूख खानचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पार्श्वभूमीवर किंग खान ASK SRK या कँपेनच्या माध्यमातून ट्विटरवरून चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत आहे. या कँपेनमध्ये शाहरूखने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना मजेशीर उत्तर दिली.
शाहरूख म्हणाला - प्रेक्षकांसाठी काही खास बनवायला वेळ लागतो
चाहत्यांनी शाहरूखला जवानच्या रिलीज डेटविषयी प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला- प्रेक्षकांसाठी काही सर्वोत्तम बनवण्यासाठी वेळ लागतो.
निर्मात्यांनी पोस्टरमध्ये चेहरा दाखवण्याची परवानगी दिली नाही
यादरम्यान एका चाहत्याने पोस्टरमध्ये शाहरूखचा चेहरा न दिसल्याविषयी प्रश्न विचारला. यावर त्याने उत्तर दिले- निर्मात्यांनी चेहरा दाखवण्याची परवानगी दिली नाही. म्हटले माझे नावच पुरेसे आहे.
शाहरूखच्या चाहत्यांसोबतच्या प्रश्नोत्तरांवर एक नजर टाकूया...
प्रश्न- जवानमध्ये तुमच्या चेहऱ्यावर इतक्या पट्ट्या का आहेत?
उत्तर- जंगलात शूटिंग करताना मच्छर खूप चावायचे, म्हणून आम्ही असे केले.
प्रश्न - भाऊ 100-200 जास्त घ्या, पण जवान उद्याच रिलीज करा
उत्तर - भाऊ, इतक्या पैशांत तर ओटीटीचे सबस्क्रिप्शनही मिळत नाही, तुला पूर्ण चित्रपट हवा आहे.
प्रश्न - सर यावेळी पार्टी जवानच्या घरी होणार की पठाणच्या घरी?
उत्तर - यावेळी तुझ्या घरी करू.
प्रश्न - जवानच्या पोस्टरवर अबराम, सुहाना आणि आर्यनची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर - अबरामला वाटले की मी आईसारखा दिसतो.
प्रश्न - नयनताराविषयी एका शब्दात सांगा.
उत्तर - त्या खूप छान आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मजा आली.
प्रश्न - चित्रपट पाहण्यासाठी सीटबेल्टची गरज भासेल?
उत्तर - नाही, एका हेल्मेटने काम होईल.
प्रश्न- पठाण 12 मे रोजी बांगलादेशात रिलीज होत आहे, तिथल्या चाहत्यांसाटी काही म्हणू इच्छिता?
उत्तर - आशा आहे की त्यांना हा चित्रपट आवडेल आणि ते जवानसाठी तयार राहतील.
ही बातमीही वाचा...
रिलीज डेट:जवान 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार, शाहरुख खान-गौरी यांनी शेअर केली चित्रपटाची नवी रिलीज डेट
शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान या वर्षी 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि चित्रपटाची निर्माती गौरी खान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.