आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान हे मागील 30 वर्षांपासून एकमेकांची साथ निभावत आहेत. पण दोघांचे लग्न सहजासहजी झाले नव्हते. गौरीचे आईवडील त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. एका जुन्या मुलाखतीत गौरीने खुलासा केला होता की, लग्नाच्या वेळी शाहरुखचे हिंदू नाव ठेवण्यात आले होते. गौरीच्या हट्टापुढे तिच्या आईवडिलांना माघार घ्यावी लागली होती आणि अखेर त्यांनी या लग्नासाठी परवानगी दिली होती. या दोघांचे लग्न झाले तेव्हा शाहरुख केवळ 26 वर्षांचा होता आणि गौरी फक्त 21 वर्षांची होती.
तो बालिशपणा होता
2008 मध्ये संदीप खोसला आणि अबू जानी यांना दिलेल्या मुलाखतीत गौरीने सांगितले होते, "आम्ही त्यावेळी लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यासाठी लहान होतो. विशेष म्हणजे सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या एका दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी मी लग्न करणार होते. त्यावेळी आम्ही शाहरुखचे नाव बदलून अभिनव ठेवले होते जेणेकरून तो हिंदू असल्याचे समाधान आम्हाला मिळेल, पण ते खूप मूर्खपणाचे आणि बालिश वागणे होते याची मला जाणीव नंतर झाली," अशी कबुली गौरीने या मुलाखतीत दिली होती.
तीनही मुलं करतात दोन्ही धर्मांचे पालन
शाहरुख आणि गौरी यांना आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं हिंदू आणि मुस्लिम धर्मांचे पालन करत असल्याचे गौरीने मुलाखतीत सांगितले होते. "दिवाळीच्या दिवशी घरातील पूजा मी करते आणि इतर सगळे त्याप्रमाणे मला फॉलो करतात, ईदच्या दिवशी शाहरुख सगळी प्रार्थना करतो आणि आम्ही सगळे त्याचे अनुकरण करतो. आमच्या मुलांनी ही गोष्ट अगदी सहज स्वीकारली आहे. त्यांना दिवाळी ईद दोन्हीचं खूप कौतुक आहे," असे गौरीने सांगितले.
पहिल्यांदा दिल्लीच्या क्लबमध्ये भेटले होते शाहरुख-गौरी
शाहरुख आणि गौरी यांची पहिली भेट 1984 मध्ये दिल्लीतील एका क्लबमध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख 19 वर्षांचा होता तर गौरी 14 वर्षांची होती. प्रथमदर्शनी शाहरुख गौरीकडे बघतच राहिला होता. यानंतर शाहरुख गौरी जिथे जायची तिथे तिला फॉलो करायचा. तिसऱ्या भेटीत शाहरुखला गौरीच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला. यानंतर दोघेही बोलू लागले. शाहरुख आणि गौरी कोड वर्डमध्ये बोलायचे जेणेकरून कोणालाही सुगावा लागला नाही. त्याच दरम्यान शाहरुखने गौरीला प्रपोज केले होते.
शाहरुख-गौरीला तीनदा लग्न करावे लागले
गौरीलाही शाहरुखसोबत लग्न करायचे होते पण तिच्या घरच्यांचा त्याला तीव्र विरोध होता. शेवटी तिने घरच्यांना लग्नासाठी राजी केले. वृत्तांनुसार, शाहरुख आणि गौरीने एकदा नव्हे तर तीनदा लग्न केले होते. दोघांनी आधी कोर्टात लग्न केले. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.